Tarun Bharat

कोरोना बाधित महिलेचा जबाब घेण्यास गेलेल्या आशावर्कर्सला मारहाण

माढा तालुक्यातील कव्हे येथील घटना

तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी

घरी विलगीकरणात असलेल्या कोरोनाबाधित महिलेचा जबाब घ्यावयास गेलेल्या आशावर्कर्सला बाधित महिलेच्या पतीने मारहाण करुन तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी कव्हे (ता. माढा) येथे घडली. याबाबत आशा वर्कर्स शोभा प्रवीण मेहता यांनी सुधीर चोपडे यांच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत आज फिर्याद दिली आहे.      

 दि. 14 रोजी सुधीर चोपडे यांच्या पत्नी कोरोनाबाधित झाल्या असून त्यांना डॉक्टर आणि ग्रामपंचायतीने कुर्डुवाडी येथील कोविड सेंटरला जाण्यास सांगितले असता त्यांनी घरीच विलगीकरणात थांबत असल्याचे सांगितले. दि. 21 रोजी स. 9.30 डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आशावर्कर्स शोभा या सुधीर यांच्या पत्नीचा जबाब घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यावेळी त्या घरी नसल्यामुळे फिर्यादी आशा वर्कर्स यांनी सुधीर यांच्या मुलीची जबाबावर सही घेतली. याचाच राग मनात धरून सुधीर चोपडे यांनी फिर्यादीस तिच्या घरी जाऊन मारहाण केली व तिच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली.

Related Stories

दिवे घाटात, माउली थाटात.!

Abhijeet Khandekar

कोरोना जनजागृतीसाठी बार्शीत पोलिसांचा रूट मार्च

Archana Banage

दोन लाखांच्या लाचप्रकरणी पोलीस नाईकासह दोघांना अटक

Archana Banage

शेतकरी आंदोलनातील शहीद शेतकऱ्यांना आम आदमी पार्टीतर्फे श्रद्धांजली अर्पण

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यात सहा हजार बाधित रुग्ण ; 2,810 जण ठणठणीत

Archana Banage

पंकजा मुंडेंच्या उपोषणाबाबत संभ्रमावस्था

prashant_c