Tarun Bharat

कोरोना बाधित रुग्णावर जयसिंगपूर नगरपरिषदेने केले अंत्यसंस्कार

प्रतिनिधी / जयसिंगपूर

हुपरी येथील ५० वर्षांचे गृहस्थ कोरोनाची बाधा झाल्यामुळे जयसिंगपूर येथील एका खाजगी प्रथितयश रुग्णालयात मागील चार दिवसांपासून उपचार घेत होते, उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला संबंधित रुग्णालयाने त्यांच्या मृत्यू बाबत तालुका प्रशासनाला तातडीने कळविले, मृतांच्या नातेवाईकांनी सदर रुग्णाचा मृतदेह हुपरी गावी नेण्यास असमर्थता दर्शविली यावर शिरोळच्या तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी जयसिंगपुर नगरपरिषदेस सदर बाधित रुग्णाच्या मृतदेहावर जयसिंगपूर मध्ये अंत्यसंस्कार करण्याबाबतच्या सूचना जयसिंगपूर नगरपरिषदेस दिल्या.

नगरपालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करत उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देऊन जयसिंगपूर उदगांव येथील वैकुंठ स्मशानभूमीत संबंधित मृतदेहाचा अंत्यविधी पार पाडला, या अंत्यविधीसाठी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी श्रीमती. टीना गवळी, नगरसेवक राहुल बंडगर, महेश कलकुटगी, राजेंद्र झेले, अर्जुन देशमुख, बाळासाहेब वगरे व मृत रुग्णाचे मोजके नातेवाईक, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचारी, संबंधित रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

प्रशासनाला नेहमीच उशिरा जाग का?

Patil_p

Ratnagiri : संगमेश्वरमध्ये साडेसात लाखाच्या दागिन्यांची चोरी…दागिने घरातूनच हस्तगत

Abhijeet Khandekar

काँग्रेस नेते सिद्धरामय्या बेंगळूर रुग्णालयात दाखल

Archana Banage

केस्ली मिशेलला स्प्रिंट सायकलिंगमध्ये सुवर्ण

Patil_p

खरीप हंगामातील खते, बी-बियाणांचा सुरळीत पुरवठ्यासाठी नियोजन करणार : पालकमंत्री पाटील

Archana Banage

राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श पुढे नेणे गरजेचे माजी आमदार चंद्रदीप नरके

Archana Banage