Tarun Bharat

कोरोना : महाराष्ट्रातील बाधितांनी ओलांडला 60 लाखांचा टप्पा

  • मागील 24 तासात 9,844 नवे रुग्ण; 197 मृत्यू 


ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात चढ – उतार होताना दिसत आहे. मागील 24 तासात 9 हजार 844 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 9,371 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 197 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.93 %


राज्यात आजपर्यंत एकूण 57 लाख 62 हजार 661 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.93 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे. 

  • 6.32 लाख व्यक्ती होम क्वारंटाईन 


दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,03,60,931 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 07 हजार 431 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 32 हजार 453 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4,166 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

  • मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण  


राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 21 हजार 767 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये मुंबई पालिका हद्दीत हा आकडा 18,687 इतका आहे. तर, पुण्यात एकूण 17 हजार 363 इतके रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या 12 हजार 999 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या 9,704 इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या 3 हजार 862 इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 999 इतकी आहे.

Related Stories

ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघात; 13 जण जागीच ठार, 4 जखमी

Tousif Mujawar

खंडपीठ प्रश्न जिव्हाळ्याचा, तातडीने मार्गी लावू ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Abhijeet Khandekar

नीती आयोगाच्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा, पूर्ण बिल्डिंग सील

prashant_c

देवगड हापूस सातारच्या बाजारपेठेत दाखल

Patil_p

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

नळाच्या पाण्यातून आळय़ा येण्याचे थांबेनाच

Patil_p