Tarun Bharat

कोरोना : महाराष्ट्रात एका दिवसात 44,493 रुग्णांना डिस्चार्ज; 555 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून  कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 29 हजार 644 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 44 हजार 493 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 55 लाख 27 हजार 092 वर पोहचली आहे. 


दरम्यान, कालच्या दिवशी 555 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 86 हजार 616 वर पोहचला आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 50 लाख 70 हजार 801 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 91.74 % इतके आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.57 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 3 लाख 67 हजार 121 रुग्ण उपचार घेत आहेत. 


आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 24 लाख 41 हजार 776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17.04 % रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27 लाख 94 हजार 457 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 20 हजार 946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. 

Related Stories

भाजप आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Tousif Mujawar

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा अन्यायकारक शासन आदेश रद्द झालाच पाहिजे

Archana Banage

केंद्राने नागालँडचा अफ्सा कायदा 6 महिन्यांसाठी वाढवला

Abhijeet Khandekar

‘मलाही पेगॅससची ऑफर’; ममता बॅनर्जींचा मोठा खुलासा

Archana Banage

Kolhapur : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Abhijeet Khandekar

साहित्यकारांनी समाजात शाश्वत मूल्ये रुजवावीत : कथाकथनकार आप्पासाहेब खोत

Archana Banage