Tarun Bharat

कोरोना : महाराष्ट्रात धोका वाढला

Advertisements

भयंकर ! राज्यात 62.70 सक्रिय रुग्ण, महाराष्ट्रात 62.70 टक्के रुग्ण, 3,36 584 सक्रिय रुग्णांची नोंद

प्रतिनिधी / मुंबई

राज्यात 62.70 टक्के सक्रिय रुग्ण वाढले असल्याची गंभीर बाब समोर येत असून सोमवारी राज्यात 3,36584 सक्रिय रुग्णांची नोंद झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सक्रिय रुग्णांमध्ये देशात महाराष्ट्र राज्य अव्वल त्या पाठोपाठ केरळ, पंजाब, कर्नाटक व छत्तीसगड ही राज्य येत आहेत. मात्र या राज्यामधील सक्रिय रुग्णांची टक्केवारी एक अंकी आहे.

दरम्यान गत आठवड्यातील राज्याच्या सक्रिय रुग्ण संख्या पाहिल्यास 23 मार्च रोजी 2,30,641, तर 24 मार्च रोजी 2,47,299, तसेच 25 मार्च रोजी 2,62,685, तर 26 मार्च रोजी 2,82,451, शिवाय 27 मार्च रोजी  3,03,475, 28 मार्च रोजी 3,25,901 आणि 29 मार्च रोजी 3,36,584 सक्रिय रुग्ण नोंदविण्यात आले. ही संख्या रोज वाढत आहे. तर देशातील इतर राज्यातील सक्रिय रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास दुसऱया क्रमांकावर केरळ येत असून या ठिकाणी 4.77 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर पंजाब राज्य येत असून या ठिकाणी 4.58 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. चौथ्या क्रमांकावर कर्नाटक राज्य येत असून 4.42 प्रमाण आहे. तर छत्तीसगड राज्यात सक्रिय रुग्ण 3.69 टक्के असून पाचव्या क्रमांकावर आहे. तुलनेत इतर राज्यात 19.84 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. मात्र यात महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण असल्याचे नोंद सांगत आहे.

मुंबईत महिनाभरत 37 हजारांनी वाढ

मुंबईत एका महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल 37,763 वर पोहचली आहे. 1 मार्चला सक्रिय रुग्णसंख्या 9,690 वर होती. 29 मार्चला म्हणजे महिनाभरातच ही संख्या तब्बल 47,453 वर पोहोचली आहे. त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्या मुंबईकरांच्या चिंता वाढवणारी आहे. आकडेवारी नुसार 1 मार्च रोजी 9,690, 15 मार्च रोजी  14,582, तर 25 मार्च रोजी 33,961 तसेच 29 मार्च  47,453 असे सक्रिय रुग्ण मुंबईत नोंद आहेत.

रुग्णसंख्या वाढत आहेच. त्यात सक्रिय रुग्ण संख्या ही वाढती आहे. सध्या तणावाचे वातावरण असून लोक ध्यानात घेत नाहीत. आरोग्य यंत्रणा सतत काम करत असून खासगी आणि सरकारी दोन्ही रुग्णालयांमधील खाटा भरल्या जात आहेत. आगामी 15 दिवस परीक्षेचे असून कोण ध्यानात घेत नाही. त्यामुळे परिस्थिती कठीण आहे.

डॉ. सुभाष साळुंखे, कोविड 19 राज्य तांत्रिक सल्लागार

Related Stories

पुणे : फटाके दुकानापासून 100 मीटरच्या परिसरात फटाके उडविण्यास मनाई

Rohan_P

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षादलांमध्ये चकमक; तिघांचा खात्मा

Sumit Tambekar

मराठा क्रांती मोर्चाची उद्या नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठक

Abhijeet Shinde

सातारकरांना कंकणकृती सूर्यग्रहणाचे ओझरते दर्शन

Patil_p

अत्यावश्यक विभागातील नोकरभरतीत मागासवर्गीय अनुशेष भरून काढा

Abhijeet Shinde

सोलापुरात आज दोघींचा मृत्यू, सात नवे कोरोनाबाधित रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!