ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 10 हजार 107 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 10 हजार 567 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 59 लाख 34 हजार 880 वर पोहचली आहे.


दरम्यान, कालच्या दिवशी 237 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे सद्य स्थितीत राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.94 % इतके आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 56 लाख 79 हजार 746 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 95.7 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 1,36,661 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 86 लाख 41 हजार 639 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15.36 % रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 78 हजार 781 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 05 हजार 401 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.