Tarun Bharat

कोरोना : महाराष्ट्रात 1 लाख 01 हजार 337 सक्रिय रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या प्रमाणात घट होताना दिसत आहे. मागील 24 तासात 7 हजार 761 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 13,452 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कालच्या दिवशी 167 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 


राज्यात आजपर्यंत एकूण 59 लाख 65 हजार 644 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.27 टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.04 टक्के एवढा आहे.


दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,50,39, 617 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61 लाख 97 हजार 018 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,85,967 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,576 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

  • सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात 


राज्यात सद्य स्थितीत 1 लाख 01 हजार 337 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा 17 हजार 096 इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण 15 हजार 826 इतके रुग्ण आहेत. तर, मुंबई महापालिका हद्दीत सध्या 10 हजार 913 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर सांगलीत सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. सांगलीत ही संख्या 9 हजार 920 इतकी आहे. कोल्हापुरात ही संख्या 9 हजार 529 इतकी आहे. तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या 2 हजार 300 इतकी झाली आहे.

Related Stories

मनमोहन सिंग यांच्या पत्राला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिले उत्तर; म्हणाले…

Archana Banage

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंह यांचे निधन

Tousif Mujawar

श्रीलंकेत महागाईचा भडका !

Archana Banage

सातारा : राष्ट्रवादी कार्यालयावर अज्ञातांकडून दगड फेक

Archana Banage

इम्रान खान यांनी भारताच्या ‘या’ निर्णयाचं केलं कौतुक

Archana Banage

कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर लोकसभेत सुप्रिया सुळे आणि विनायक राऊतांचा हल्लाबोल

Archana Banage