Tarun Bharat

कोरोना मुकाबल्यासाठी पाकिस्तान घेणार 150 कोटी डॉलर्सचे कर्ज

ऑनलाईन टीम / इस्लामाबाद : 

कर्जबाजारी पाकिस्तान कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून 150 कोटी डॉलर्सचे कर्ज घेणार आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आशियाई विकास बँक, जागतिक बँक आणि आशियाई इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हल्पमेंट या तीन वित्त संस्थांसोबत करारांवर स्वाक्षरी केल्या आहेत. या तिन्ही संस्था पाकिस्तानला प्रत्येकी 50 कोटी डॉलर्सचे कर्ज देणार आहेत.

पाकिस्तानमधील आरोग्य यंत्रणा सुसज्ज बनवणे, आवश्यक वैद्यकीय उपकरणांची खरेदी, कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवणे, यासाठी या पैशांचा वापर करण्यात येणार आहे.

Related Stories

अमेरिका संसदेतील हिंसेला वर्ष पूर्ण

Amit Kulkarni

इटली, इराणमध्ये कोरोना फोफावला

tarunbharat

6 फूट 10 इंच उंचीच्या महिलेच्या नावावर विक्रम

Patil_p

ईश्वरप्पा यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा

Archana Banage

कोरोना रुग्णवाढ : आठ राज्यांना केंद्राच्या विशेष सूचना

datta jadhav

पाकिस्तान : शाळा सुरू

Patil_p