बेंगळूर : राज्यात कोरोना नियंत्रणासंबंधी मंत्र्यांकडून वेगवेगळय़ा प्रकारची विधाने करण्यात येत असल्याने राज्य सरकारच्या कार्यपद्धतीविषयी जनतेमध्ये गोंधळ निर्माण होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सोमवारी बेंगळूरमध्ये पार पडलेल्या उच्चस्तरिय बैठकीत राज्य सरकारच्या मुख्य सचिवांव्यतिरिक्त कोणीही आदेश जारी करू नये, असे फर्मान काढले आहे. राज्यात कोरोना परिस्थितीमुळे लॉकडाऊन, नाईट कर्फ्यु, मिनी लॉकडाऊन जारी करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केवळ राज्य सरकारच्या मुख्य सचिवांनाच आदेशपत्रक काढण्याची सूचना दिली आहे. मुख्य सचिवांशिवाय कोणीही आदेश जारी करून नयेत, अशी सक्त सूचनाही त्यांनी दिली आहे. मुख्य सचिवांनी आपल्याकडून संमती मिळाल्यानंतरच आदेशपत्रक काढावे, अशी सूचनाही येडियुराप्पा यांनी दिली आहे.


previous post
next post