Tarun Bharat

कोरोना युद्धासाठी एशियन बँकेचे भारताला1.5 अज्ब डॉलर्सचे कर्ज

आर्थिक कमकुवत वर्गांच्या मदतीला प्राधान्य देण्याच्या सूचना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एशियन डेव्हलमेंट बँकेने (एडीबी) भारताला 1.5 अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास मंजुरी दिली आहे. कोरोना महामारीविरोधातील युद्धासाठी मदत म्हणून हे कर्ज देण्यात येत असल्याचे बँकेचेअध्यक्ष मात्सुगु असकावा यांनी म्हटले आहे.

कोरोनाविरोधात भारताने आतापर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणूनच कोरोनाची साथ रोखण्याबरोबरच गरीब आणि आर्थिक कमजोर वर्गाला सामाजिक संरक्षण आणि प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यासाठी त्याचा वापर करता येणार आहे. ही मदत तातडीने दिली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये एडीबी भारताला मदत देण्यास कटीबद्ध आहे. आरोग्य, गरीब, असंघटीत कामगार, लघु आणि मध्यम उद्योग, वित्तीय क्षेत्रातील परिणाम रोखण्यासाठी या निधीचा वापर करता येणार आहे.

Related Stories

मध्यप्रदेश : काँग्रेस नेते पी सी शर्मा अटकेत

datta jadhav

नोटाबंदीच्या निर्णयाची होणार चौकशी

datta jadhav

यवतमाळ : एसटी बसच्या भीषण अपघातात 4 मजूर ठार, 15 जखमी

datta jadhav

भाजप अधिक बळकट होण्यास काँग्रेस जबाबदार – ममता बॅनर्जी

Archana Banage

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 10 लाखाचा टप्पा

datta jadhav

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

Tousif Mujawar