Tarun Bharat

कोरोना योद्धा कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

प्रतिनिधी / सातारा : 

कोरोना संसर्ग सुरु झाल्यावर शासनाकडे कोणतीही यंत्रणा नव्हती, कर्मचारी नव्हते. कोरोनाची दाहकता वाढू लागल्यावर शासनाने कोरोना संपेपर्यंत अशा अटीवर सातारा जिल्हय़ात आरोग्य विभागात विविध कामांसाठी 798 कर्मचारी नियुक्त केले. मात्र, गत महिन्यात या कर्मचाऱ्यांना कोणतीही नोटीस वा पूर्वसूचना न देता कामावरुन कमी केल्याने आता कोरोना योध्दा कर्मचारी परिषदेकडून सोमवार दि. 13 रोजीपासून आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

कोरोना कर्मचारी योध्दा कर्मचारी परिषदेने याबाबत मुख्यमंत्र्यांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱयांना निवेदन देवून याबाबतची कल्पना दिली आहे. 2 ते 8 सप्टेंबर कालावधीत कोरोना योध्दा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला जिल्हय़ातील अनेक संघटना व मान्यवरांनी पाठिंबा व्यक्त केला केला. मात्र, तरी देखील राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांची दखल घेतलेली नाही. ज्या कोरोना कर्मचाऱ्यांनी गेल्या दीड वर्षांपासून जीवावर उदार होवून अनेकांचे जीव वाचवले त्यांना बेकायदेशीरपणे कोणतीही नोटीस न देता कामावरुन कमी करुन शासनाने कायदा मोडला आहे. आता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वृषाली खरात आमरण उपोषण सुरु करत असून मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. ज्या प्रमाणे आरटीपीसीआर लॅब बंद पडल्यावर आरोग्य विभागाने 40 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा पूर्ववत केल्या त्याच्या पध्दतीने सर्व कोरोना योध्दा कर्मचाऱयांना न्याय द्या, ही त्यांची मागणी आहे.  

Related Stories

सातारा : कृषी अधिकाऱ्यांकडून विभागाची अचानक तपासणी

datta jadhav

शहर कार्बन न्यूर्टल सिटी बनणार

Patil_p

सातारा : …अखेर बावधनचं बगाड निघालं

datta jadhav

महावितरणला आत्मदहनाचा इशारा

Archana Banage

सातारा जिल्हा परिषदेमध्ये लसीकरण झालेल्याच नागरिकांना प्रवेश

Amit Kulkarni

सहय़ाद्रि कारखान्याकडून 150 बेडच्या कोविड सेंटरची उभारणी

Patil_p