Tarun Bharat

कोरोना योद्ध्यांच्या हस्ते यंदा श्री महालक्ष्मी मंदिरात प्रतिष्ठापना

  • शनिवारपासून श्री महालक्ष्मी सारसबाग मंदिरात नवरात्र महोत्सव

ऑनलाईन टीम / पुणे :

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ शनिवार, दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 वाजता घटस्थापनेने होणार आहे. कोरोनायोद्धे असलेल्या स्त्री रोगतज्ञ डॉ.क्षमा उप लेंचवार आणि नेत्ररोगतज्ञ डॉ.निलेश उपलेंचवार यांच्या हस्ते पूजन होणार असून भक्तांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वांचे हित घेता यंदाचा उत्सव साधेपणाने करण्यात येणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांनी दिली. 


श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागचे प्रमुख विश्वस्त व विश्वस्तांच्या सभेमध्ये उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहेे. यावर्षी कोरोना काळात तब्बल 1 हजार रुग्णांना डॉ. क्षमा उपलेंचवार आणि डॉ.निलेश उपलेंचवार यांनी आरोग्यसेवा दिली आहे. त्याबद्दल त्यांचा सन्मान देखील मंदिरातर्फे करण्यात येणार आहे. 

प्रशासनाच्या सर्व सूचनांनुसार खबरदारी घेण्यात येणार आहे. मंदिरात सुरक्षितेच्या दृष्टीने सी.सी. टी.व्ही.ची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. मंदिरामध्ये ब्रह्मवृंदाच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम होणार असून विविध सामाजिक उपक्रमांवर देखील भर देण्यात येणार आहे. यंदाचा उत्सवाचा खर्च कोरोनाकाळात सेवा दिलेल्या व समाजातील गरजू घटकांसाठी करण्यात येणार आहे. श्री महालक्ष्मी माता, श्री महासरस्वती माता व श्री महाकाली माता यांच्या चरणी कोरोना महामारीचे  संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना करण्यात येणार आहे.

  • कोविड सेंटर्सना प्रसाद पाठविणार

श्री महालक्ष्मी मातेसमोर नवरात्र उत्सवात नऊ दिवस दररोज सुमारे 2000 ते 2500 फळांचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. दररोज वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखविण्यात येणार असून हा फळांचा प्रसाद पुण्यातील विविध कोविड सेंटर्सना पाठविण्यात येणार आहे. कोविड सेंटर्समधील रुग्ण, कर्मचारी व डॉक्टरांकरीता हा प्रसाद असणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामाध्यमातून संपूर्ण उत्सवात सुमारे 20 हजार फळे कोविड सेंटर्समधील रुग्ण व कर्मचाऱ्यांना देण्यात येतील, असे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांनी सांगितले.

Related Stories

ऊंट गाडीवर पहिली मोबाइल लायब्रेरी

Amit Kulkarni

एकाच वेळी नऊ महिलांशी विवाह

Patil_p

104 वर्षांपासून एकाच घरात वास्तव्य

Amit Kulkarni

एक शरीर, दोन जीव

Patil_p

कौतुकास्पद! प्रियांकाचे ‘अनफिनिश्ड’ हे पुस्तक अवघ्या 12 तासात नंबर वन वर

Tousif Mujawar

पाळीव प्राण्यांचा क्लोन तयार करतेय कंपनी

Patil_p