Tarun Bharat

कोरोना योद्धय़ांसाठी ‘चैतन्य केंद्र’

शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांच्याकडून उद्घाटन

प्रतिनिधी / बेंगळूर

कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणाऱया कोरोना योद्धय़ांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी बेंगळूरच्या राजाजीनगर येथे ‘चैतन्य केंद्र’ सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली आहे.

चैतन्य केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पोलीस, आशा कार्यकर्त्या, नर्स, डॉक्टर आणि कोविड नियंत्रणाच्या कामात गुंतलेल्या कार्यकर्त्यांना बाष्प (स्टीम), काढा आणि पिण्यासाठी गरम पाणी याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोरोना योद्धय़ांच्या सेवेची दखल घेण्याचा हा प्रयत्न आहे. यामुळे समाजात विश्वास वाढविण्याचे काम सुरू आहे, असे ते म्हणाले.

घरोघरी ऑक्सिजन रुग्णवाहिका सेवेबरोबरच 20 ऑक्सिजन सिलिंडरद्वारे आवश्यकता असणाऱया व्यक्तींच्या घरी ऑक्सिजन पुरविण्याचे काम सुरू रविवारपासून झाले आहे. भाष्यम सर्कलजवळ असणाऱया डॉ. नागराज यांच्या इस्पितळात 20 ऑक्सिजन सिलिंडर्सची व्यवस्था असणारे कोविड केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहे. दोन दिवसात हे केंद्र कोरोनाबाधितांच्या सेवेत दाखल होईल. राजाजीनगर विभाग भाजपकडून मोफत रुग्णवाहिका सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची व्यवस्था देखील आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी यावेळी दिली.

Related Stories

कर्नाटकात उद्यापासून १४ दिवसाचा कडक लॉकडाऊन

Archana Banage

“भविष्यात भगवा ध्वज राष्ट्रध्वज बनू शकतो, सध्या तिरंग्याचा आदर करा”

Archana Banage

बेंगळूर हिंसाचार: पोलिसांनी जलद कारवाई केली गेली असती तर घटना टळली असती : सिद्धरामय्या

Archana Banage

बेंगळूरमध्ये लसीकरण दुप्पट केले जाणार : बीबीएमपी आयुक्त

Archana Banage

म्हैसूर: दसऱ्याला चीन निर्मित उत्पादनांची विक्री नाही : येडियुरप्पा

Archana Banage

कर्नाटक: शिवमोगात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Archana Banage