Tarun Bharat

कोरोना योध्दयांचा सन्मान करणे आद्य कर्तव्य – मंत्री यड्रावकर

प्रतिनिधी / सांगली

कोरोनाच्या महामारीच्या काळात आपल्या जीवाची काळजी न करता अनेक कोरोना योध्द्यांनी काम केले आहे. या महामारीला रोखण्यासाठी नानाविद्य उपाययोजना अनेकांनी केल्या आहेत. या सर्व कोरोना योध्दयांचा सन्मान करणे आपले आद्य कर्तव्य ठरते आहे. असे प्रतिपादन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.

श्री चिन्मयसागर चॅरिटेबल ट्रस्ट आणि वर्ल्ड डॉक्टर्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने प.पु.मुनिश्री चिन्मयसागर महाराज यांच्या प्रथम समाधीवर्षाचे औचित्य साधून चिन्मयसागर कोरोना वॉरियर पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. ना.यड्रावकर-पाटील यांच्याहस्ते कोरोना सारख्या महामारीच्या काळात अतुलनीय योगदान देणाऱया समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

माजी महापौर सुरेश पाटील म्हणाले, याचदिवशी चिन्मयसागर महाराजांनी समाधी घेतली होती. त्यांनी सर्व जातीधर्मासाठी मोठे योगदान दिले आहे. जेंव्हा मुनींचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी चिन्मयसागर महाराजांचे नाव अग्रभागी असेल. त्याच्या प्रथम समाधी वर्षाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात कोरोनाच्या काळात चांगले काम केलेल्या व्यक्तीचा आज सन्मात होत आहे ही अत्यंत चांगली गोष्ट आहे.

चिन्मयसागर महाराजांचे बालपणीचे मित्र असणाऱया डॉ.सोमशेखर पाटील यांनी महाराजांबद्दलच्या आठवणी सांगितल्या. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले, कोरोनाबाबत दक्षता बाळगून स्वतःला सुरक्षित ठेवणारे सर्वजण कोरोना योद्धे आहेत. अजून कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट केंव्हाही येऊ शकते. येत्या काही दिवसात आपले दोन मोठे सण येत आहेत. त्याकाळात लोकांनी काळजी घेतली पाहिजे, मास्क, सॅनिटायजरचा वापर करावा. तसेच सोशल डिन्स्टिसिंग ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. मनपाच्या सेवेत कधीही खंड पडणार नाही. आम्ही आमची जबाबदारी नेहमीच पूर्ण क्षमतेने पार पडू असे सांगितले.

ना.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते चिन्मयसागर कोरोना नॅशनल वॉरियर नॅशनल पुरस्काराने जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर सुरेश पाटील, डॉ.सोमशेखर पाटील, डॉ,भरत मुडलगी, डॉ.जयधवल भोमाज, डॉ.महाधवल भोमाज, डॉ,शरद देसाई, डॉ,उमेश पाटील यांना प्रदान करण्यात आला. चिन्मयसागर कोरोना वॉरियर पुरस्काराने दक्षिणभारत जैनसभा,डॉ.सुनील आंबोळे, डॉ.संजय साळुंखे, डॉ.भूपाल गिरीगोसावी, डॉ.रवींद्र ताटे, असिफ बावा, हयात फाऊंडेशन, पीरअली पुणेकर, संजय बेले, सतीश साखळकर, आयुष सेवाभावी संस्थेचे अमोल पाटील, सलगरे सरपंच तानाजी पाटील, शशिकांत पाटील, स्वच्छतादूत राकेश दड्डणावर, नगरसेवक अभिजित भोसले यांचा सन्मान करण्यात आला. आभार राजगोंडा पाटील यांनी मानले.

Related Stories

जत तालुक्यात नऊ हजार लोकांना टँकरने पाणीपुरवठा

Archana Banage

मिरजेत चाकूहल्ला करुन डॉक्टरला लुबाडले

Archana Banage

सांगली: महापालिका क्षेत्रातील ९९ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

Archana Banage

ई-पीक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी नोंदणी करावी – पालकमंत्री

Archana Banage

नागठाणे बंधारा पाण्याखाली

Archana Banage

सांगली : रयतच्या नेहरू विद्यालय, हिंगणगाव बुद्रुकला आय.एस.ओ. मानांकन

Archana Banage