Tarun Bharat

कोरोना रुग्णसंख्येत फ्रान्स जगात चौथ्या स्थानी

Advertisements

ऑनलाईन टीम / पॅरिस : 

कोरोना रुग्णसंख्येत फ्रान्सने रशिया आणि स्पेनला मागे टाकत जगात चौथे स्थान गाठले आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 18 लाख 07 हजार 479 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 40 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी फ्रान्समध्ये 20 हजार 155 कोरोना रुग्ण आढळून आले. तर 548 जणांचा मृत्यू झाला. 18.07 रुग्णसंख्येपैकी 1 लाख 29 हजार 735 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 16 लाख 36 हजार 757 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 4790 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. फ्रान्समध्ये 1 कोटी 81 लाख 20 हजार 790 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 1 कोटी 04 लाख 22 हजार 026 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 44 हजार 449 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर रुग्णवाढीच्या संख्येत भारताचा दुसरा तर ब्राझीलचा तिसरा क्रमांक लागतो.

Related Stories

ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा लॉकडाऊन सुरू – नागरिकांमध्ये नाराजी

Patil_p

टेक्सासच्या वॉटरपार्कमध्ये रसायन गळती

Patil_p

इजिप्त : 347 नवे रुग्ण

Patil_p

भारतीय महिला अंतराळात झेपावणार

datta jadhav

कोरोनामुळे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा मृत्यू

prashant_c

सर्वात हुशार विद्यार्थ्यांमध्ये नताशा सामील

Patil_p
error: Content is protected !!