ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात विशेषता मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेत कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक बॅगच्या कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांच्या मते, जी बॅग बाजारामध्ये 600 रुपयांना मिळते ती बॅग 6 हजार 719 रुपयांना विकत घेतली आहे. ही किंमत कुठून आली असा सवाल करत, या टेंडर मधेच घोटाळा आहे असे म्हणत किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.


दरम्यान, यापूर्वी मुंबई महापालिकेच्या खरेदी विभागाने एप्रिल महिन्यात पहिली निविदा काढत 1.15 कोटी रुपयांच्या 2200 बॅगा खरेदी केल्या होत्या. परंतु आता हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र चौकशीची मागणी केली जात आहे.