नव्याने 47 पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू : सक्रिय रुग्णसंख्या 247
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्गात नियंत्रणात असलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गुरुवारी एकाच दिवशी 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना वाढीचा वेग मंदावला होता. मात्र मार्च महिना सुरू झाल्यानंतर रोज आठ ते दहा मिळणारे रुग्ण दहा-पंधरा आणि हळूहळू वीस-पंचवीसच्या संख्येने आढळू लागले आहेत. सक्रिय रुग्ण संख्याही वाढून 247 वर पोहोचली आहे.
मालवण तालुक्मयातील ओवळिये येथील 75 वषीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला. तिला उच्च रक्तदाबाचा त्रास होता. कोरोनाने आतापर्यंत 181 जणांचे बळी गेले आहेत. कोरोना बाधित एकूण रुग्णसंख्या 6 हजार 818 झाली आहे. आतापर्यंत 6 हजार 384 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्हय़ातील सद्यस्थिती : गुरुवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 47, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 247, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण सहा, बरे झालेले रुग्ण 6,384, मृत झालेले रुग्ण 181, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 6,818, चिंताजनक रुग्ण चार.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 506, दोडामार्ग – 372, कणकवली – 2073, कुडाळ – 1502, मालवण – 644, सावंतवाडी – 908, वैभववाडी – 206, वेंगुर्ले – 576, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 31.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 27, दोडामार्ग – 9, कणकवली – 60, कुडाळ – 32, मालवण – 47, सावंतवाडी – 43, वैभववाडी – 12, वेंगुर्ले – 14, जिल्हय़ाबाहेरील – तीन.
तालुकानिहाय मृत्यू : देवगड – 12, दोडामार्ग – पाच, कणकवली – 48, कुडाळ – 34, मालवण – 19, सावंतवाडी – 43, वैभववाडी – नऊ, वेंगुर्ले – 10, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – एक.
आरटीपीसीआर आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस् : तपासलेले नमुने गुरुवारी 320, एकूण 40,065. पॉझिटिव्ह आलेले नमुने 4664.
ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने : गुरुवारी 195, एकूण 29,340. पैकी पॉझिटिव्ह 2,282. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात चार रुग्ण असून त्यामध्ये ऑक्सिजनवर तीन, तर व्हेंटिलेटरवर एक रुग्ण आहे.