Tarun Bharat

कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रोबोटची निर्मिती

श्रीपेवाडीच्या अभियंत्याची यशस्वी कामगिरी : व्हिटीयुकडून मंजुरीबरोबरच आर्थिक

महेश शिंपुकडे/निपाणी

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासह कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सेवा देण्याचे आव्हान शासनापुढे निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत कोरोनाबाधिताला आरोग्य सेवा देण्यासह उपचार देताना वैद्यकीय सेवकाला संसर्ग टाळण्यासाठी पूरक ठरणारा अत्याधुनिक अशा रोबोटची निर्मिती करण्यात आली आहे. तंत्रज्ञानातून वैद्यकीय सेवेसाठी ही सुरक्षित देणगी मानली जात आहे. श्रीपेवाडी येथील अभियंते तुलसीदास दत्ता साळुंखे यांच्या या कामगिरीचा गौरव करताना विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाने रोबोट निर्मितीला मंजुरी देत आर्थिक पाठबळ दिले आहे.

निर्माण करण्यात आलेल्या या रोबोटची चाचणी बेळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आली. रोबोटने कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देताच सर्वजणच अचंबित झाले. व्हिटीयुच्या वरिष्ठांनी याला मंजुरी देत आणखी एक रोबोट निर्माण करण्याची सूचना अभियंते साळुंखे यांना दिली असून, हे दोन्ही रोबोट लवकरच कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होणार आहेत.

रोबोटच्या निर्मितीबाबत बोलताना अभियंते तुलसीदास साळुंखे म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आरोग्य सेवा देणाऱया डॉक्टर, नर्स यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रकार वाढल्याने भीती व्यक्त होत आहे. यातूनच रोबोट निर्माण करण्याची संकल्पना तयार झाली. 15 दिवसांच्या अथक प्रयत्नातून हा रोबोट निर्माण करण्यात यश आले. डॉक्टर्स, नर्स यांना यातून सुरक्षितता मिळणार आहेच. पण त्याचबरोबर कोरोना बाधितांना सर्व सेवा-सुविधा मिळणार आहेत.

संगणकीकृत असणारा हा रोबोट मोबाईल ऍपच्या माध्यमातून ऑपरेट करता येतो. यावर असणाऱया स्क्रीनमुळे डॉक्टर संबंधित रुग्णाशी संपर्क साधून उपचाराची माहिती देऊ शकतात. कोरोनाबाधित रुग्णांच्या खोलीमधील सर्व माहितीही रोबोटमुळे मिळू शकते. अत्यावश्यक सेवा-सुविधा रोबोटद्वारेच देता येणे शक्य आहे. व्हीटीयुने याला मंजुरी देताना निर्मितीसाठी येणाऱया खर्चाची तरतूदही केली आहे, असे सांगितले.

Related Stories

विवाहितेवर हल्ला तर मुलाचा गळा चिरून खून..!

Rohit Salunke

ऐश्वर्या हिट्टणगी यांना पीएचडी प्रदान

Amit Kulkarni

तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीक वाहनचालकांचे हाल

Omkar B

शहर गटशिक्षणाधिकारी कार्यालय देखील सेवेत

Patil_p

शहरासह ग्रामीण भागातील बससेवा ठप्प

Patil_p

हरणाच्या अवयवांची तस्करी : दोघांना अटक

Amit Kulkarni