Tarun Bharat

कोरोना रुग्णालयात आग; गुजरातमध्ये 18 जण ठार

Advertisements

मृतांमध्ये दोन नर्स, 16 कोरोना रुग्णांचा समावेश

अहमदाबाद / वृत्तसंस्था

महाराष्ट्रात रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटना घडत असतानाच शनिवारी गुजरातमधील भरुच परिसरातल्या पटेल वेलफेअर रुग्णालयात अग्निप्रलयाची घटना घडली. मध्यरात्री 12.30 च्या सुमारास आगीची घटना घडल्यानंतर सर्वांचीच धावपळ उडाली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांकडून देण्यात आली. मृतांमध्ये 16 कोरोना रुग्ण आणि दोन स्टाफ नर्सचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले.

भरुच येथील पटेल वेलफेअर रुग्णालयातच कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र केंद्र बनवण्यात आले होते. या केंद्रातच आगीची घटना घडली. आगीची घटना कशामुळे घडली याबाबत काहीच उलगडा झालेला नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तसेच रुग्णांना तातडीने दुसऱया रुग्णालयात व कक्षात हलवण्याचे काम सुरू करण्यात आले. पहाटेपर्यंत मदत व बचावकार्य सुरू होते. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेप्रती शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना योग्य उपचार देण्याचा सल्लाही त्यांनी संबंधित अधिकाऱयांना दिला.

……..

Related Stories

दिल्ली परिसर पुन्हा भूकंप हादरला

Patil_p

आप आमदाराच्या स्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून मारहाण

Patil_p

राज्यपालांच्या अभिभाषणावर द्रमुकचा बहिष्कार

Patil_p

आता सत्येंद्र जैन यांच्या जेवणाचा व्हिडिओ उघड

Patil_p

मृत सैनिकांच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचे चीनचे प्रयत्न

Patil_p

प्रशांत किशोर राजकीय पक्ष स्थापणार

Patil_p
error: Content is protected !!