Tarun Bharat

कोरोना रुग्णालाच रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांची वणवण (व्हिडिओ)

प्रतिनिधी / उचगांव

कोल्हापूर येथे हॉस्पिटलमध्ये बेडच शिल्लक नाही, असे सांगितल्याने शेवटी सीपीआर रुग्णालय गाठलेल्या गांधीनगरच्या (ता. करवीर ) एका 62वर्षीय व्यापाऱ्यास व त्याच्या नातेवाईकांना अक्षरशः वणवण सोसावी लागली. सुरुवातीला कोल्हापूर सीपीआर येथेही बेड शिल्लक नसल्यामुळे उपचारासाठी दाखल करुन घेतले नाही. मात्र एका आमदारांचा फोन आल्यावर या रुग्णावर सीपीआर रुग्णालयात शेवटी उपचार सुरु झाले. या व्यापाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. शुक्रवारी पहाटे या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. वेळेत उपचार होणे गरजेचे असताना कोल्हापूरात कोरोना रुग्णांसाठी बेडच उपलब्ध होत नाहीत, ही गंभीर बाब समोर आली आहे.

सोशल मिडियात या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल

गांधीनगर येथील 62 वर्षीय या व्यापाराचा मृत्यू झाला आणि या प्रकाराचा ‘रुग्णालयात दाखल करुन घ्या’, अशी नातेवाईक विनवणी करीत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

गांधीनगर (ता.करवीर ) येथील एका ६२ वर्षीय व्यापाऱ्याला श्वसनाचा त्रास सुरु झाल्याने प्रथम अनेक खाजगी हॉस्पिटल व नंतर त्यांना सीपीआर रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले. तेथे त्यांची तपासणी करुन कोरोना चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला. मात्र रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना अ‍ॅडमिट केले नाही. यावेळी या व्यापाऱ्याच्या नातेवाईकाने अक्षरशः गयावया करुन येथील महिला डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना विनवणी केली. पण बेड उपलब्ध नसल्याने त्यांनी रुग्णास अ‍ॅडमिट करण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर या रुग्णास नातेवाईक गांधीनगर येथे घेवून गेले.

आमदारांच्या फोनवर सीपीआर येथे बेड उपलब्ध

त्यानंतर या व्यापाऱ्याच्या नातेवाईकांनी एका आमदारांना संपर्क केला. या आमदारांनी सीपीआर रुग्णालय येथे फोन करुन या व्यापाऱ्यास बेड उपलब्ध करुन दिला आणि शेवटी या रुग्णाची परवड थांबून त्यावर उपचार सुरु झाले. दरम्यान शुक्रवारी उपचार चालू असताना या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सीपीआर प्रशासनाने नातेवाईकांना सांगितले. या कोरोना व्यापाऱ्याच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब घेण्याचे काम चालू होते. एकीकडे कोल्हापूरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे उपचारासाठी बेडची टंचाई असे गंभीर चित्र असून यासाठी आत्तातरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.

Related Stories

राज्यभर पावसाचा धडाका

datta jadhav

Kolhapur: मूळ रंकाळा कसा होता रे भाऊ?

Archana Banage

भूस्खलनग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी चार कोटी

Patil_p

जयसिंगपुरात शववाहिकेवरून राजकीय वाद

Archana Banage

औंध येथील किराणा दुकानांना तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांची भेट

Patil_p

रत्नागिरी :कोरोनाचे नवे 8 रुग्ण तर दोन बळी

Archana Banage