Tarun Bharat

कोरोना रुग्ण आढळल्याने शाहूवाडी तालुक्यात घबराहट

Advertisements

शाहुवाडी/प्रतिनिधी

शाहुवाडी तालुक्यातील कापशी येथील मुंबईवरून आलेला तरुण कोरोना पॉजीटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना रूग्णाची संख्या आठवर गेल्याने तालुक्यात घबराहट पसरली आहे. तालुक्यात कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या तरूणाचा प्रवास मुंबई  सातारा ते कापशी असा झाल्याने त्याचा संपर्क  किती जणांशी आला याची माहिती घेतली जात आहे, तर शिराळा तालुक्यात ही संपर्क झाल्याची माहीती पुढे येत आहे. कापशी येथील युवक हा मुंबई येथे  माथाडी कामगार म्हणून काम करत आहे चार दिवसा पूर्वे तो, पत्नी, वडील दोन भाऊ, सासरे यांच्या सोबत खाजगी वाहनाने कापशीला येत असता प्रथम त्याने सातारा येथे मित्राच्या घरी थांबला होता, त्यानंतर कापशी येथे जाण्यासाठी येत असता कोकरूड पुलावरून त्यांना प्रवेश न दिल्याने ते सर्वजण पाडळीवाडी तालुका शिराळा येथील नातेवाईकांकडे मुक्काम केला होता.

  गावात येण्यासाठी विशेष प्रयत्न

सदर युवकांने गावात येण्यासाठी विशेष प्रयत्न करून गावात प्रवेश मिळवला होता मात्र गावात आल्यानंतर त्यांना होम क्वारटाईन केले होते. दोन दिवसा पूर्वी त्याचा स्वॅप घेतला असता तो पॉजीटीव्ह आल्याने तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे. चार दिवसांत चार रुग्ण सापडल्यान प्रशासनाची धावपळ वाढली आहे. दरम्यान कापशी येथील युवक कोरोना बाधीत असल्याचे समजताच कापशी गावासह परीसरात प्रशासन विशेष खबरदारी घेतली असून नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान ही प्रशासनाच्या वतीन करण्यात आले आहे.

Related Stories

पालिकेची चोवीस तास चालणारी हेल्पलाईन सुरु

Patil_p

नुकसानग्रस्त शेतकऱयांना जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ- ना. दरेकर

Patil_p

यूथ बँक ‘ आठवड्यात सुरु होणार

Archana Banage

आघाडीचा चौथा उमेदवार विजयी होणार; जयंत पाटलांनी व्यक्त केला विश्वास

Archana Banage

जयश्रीताई जाधव मोठ्या मताधिक्‍याने विजयी होतील : राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

Archana Banage

हातकणंगले तालुक्‍यात गुरुवार पर्यंत 93 मिलिमीटर पावसाची नोंद

Archana Banage
error: Content is protected !!