Tarun Bharat

कोरोना रुग्ण संख्येने गाठले द्विशतक; 8 जणांचा बळी

प्रतिनिधी/ बेळगाव

गेल्या 24 तासांमध्ये बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्ण संख्येने द्विशतक गाठले आहे. शनिवारी रात्रीपर्यंत जिल्हय़ातील 213 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण 8 जण बळी पडल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. यावरुन परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे सामोरे आले आहे.

राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थबुलेटिनमधील माहितीनुसार शनिवारी 137 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मात्र आरोग्य विभागातील अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीपर्यंत हा आकडा 213 वर पोहोचला होता. तर 24 तासांत आठ जण दगावल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. तर बेळगाव शहर, उपनगरांमधील सहा जण कोरोनामुळे दगावल्याची माहिती मिळाली आहे. शिवाजीनगर येथील 55 वषीय रहिवासी, माळी गल्ली येथील 41 वषीय युवक, रामतीर्थनगर येथील 68 वषीय वृद्धा, कॅम्प परिसरातील 57 वषीय महिला, लक्ष्मीनगर-हिंडलगा येथील 62 वषीय वृद्धा व शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या खडेबाजार परिसरातील 72 वषीय वृद्धेचा यामध्ये समावेश आहे.

मुडलगी येथील 32 वषीय महिला व अथणी येथील 56 वषीय महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. शनिवारी सायंकाळी या 8 मृतांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हेल्थ बुलेटिनमध्ये 3 मृत्यूची नोंद असली तरी ही संख्या 8 वर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते.

दरम्यान बेळगाव शहर व उपनगरांमधील 36 जणांसह एकूण 213 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मच्छे, पिरनवाडी येथे राहणाऱया राज्य राखीव दलाच्या पोलीस कुटुंबातील चौघे जण, शिवाजीनगर परिसरात असलेल्या एका खासगी इस्पितळातील डॉक्टरसह तिघे जण, माळी गल्ली, आझमनगर, शिवाजीनगर, गांधीनगर, शाहूनगर, अनगोळ, टिळकवाडी, रामतीर्थनगर, चव्हाट गल्ली, सदाशिवनगर, पाटील गल्ली, हनुमाननगर, अन्नपूर्णवाडी येथील रुग्णांचा समावेश आहे.

बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनाही लागण

कोल्हापूर सर्कलजवळही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गोकाक, मुडलगी परिसरातील 50 जणांचा यामध्ये समावेश आहे. अथणी तालुक्मयातही रुग्ण संख्या वाढतीच आहे. बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हुक्केरी, चिकोडी, खानापूर, सौंदत्ती, रामदुर्ग तालुक्मयातील बाधितांना सिव्हिल हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मृतांचा आकडा 39 च्या घरात

कोरोना बळींची संख्या वाढत चालली आहे. यामध्ये बहुतेकांचा मृत्यू सारीमुळे झाल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये आतापर्यंत 39 हून अधिक जणांचा बळी गेल्याची माहिती मिळाली आहे. सरकारी हेल्थ बुलेटिनमध्ये मात्र जिल्हय़ातून एकूण बळीचा आकडा 24 दाखविण्यात आला आहे. प्रत्यक्षात हा आकडा 39 हून अधिक असल्याची माहिती मिळाली आहे.

आज तिसरे लॉकडाऊन

कोरोना थोपविण्यासाठी राज्य सरकारने दर रविवारी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. 19 जुलै रोजी बेळगाव शहर व जिहय़ात तिसरे लॉकडाऊन होणार आहे. दूध, औषधे व इतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत. गेले दोन रविवारी शहर व उपनगरात यशस्वीपणे लॉकडाऊन झाले. सध्या रुग्ण संख्या व मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे केवळ रविवार नको तर किमान आठ दिवस आणखी लॉकडाऊन वाढविण्याची मागणी वाढली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी लॉकडाऊनची गरज नाही, अशी ठाम भूमिका मांडली असली तरी सोमवारी या संबंधी निर्णय होण्याची शक्मयता आहे.

बाधित डॉक्टरांची संख्याही वाढली

आजवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱया दहाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता खासगी इस्पितळातील डॉक्टरांनाही कोरोनाची लागण झाल्याचे शनिवारी स्पष्ट झाले आहे. गोकाक व बेळगाव शहरातील सहाहून अधिक डॉक्टरांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

27 जणांना घरी पाठविले

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कोरोनामुक्त झालेल्या 27 जणांना शनिवारी घरी पाठविण्यात आले. आतापर्यंत 404 हून अधिक जण बरे झाले असून सध्या उपचार घेणाऱया सक्रिय रुग्णांची संख्या 600 च्या वर आहे. खास करुन ग्रामीण भागात कोरोनारुग्ण संख्या वाढती आहे. जिल्हय़ातील अथणी, कोकटनूर, शिरगुप्पी, अनंतपूर, चिकोडी, भोज, मुगुळखोड, ऐनापूर, रायबाग, मोरब, निपाणी, जुगुळ, बैलहोंगल तालुक्मयातील उडकेरी, गुडीकट्टी, गोकाक तालुक्मयातील बेटगेरी, रायबाग तालुक्मयातील कुडची, संपगाव, तवग, निपनाळ, इरनट्टी, मल्लापूर, संगोळ्ळी, मुडलगी आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. संकेश्वर येथील परिवहन मंडळाच्या दोन कर्मचाऱयांचाही यामध्ये समावेश आहे.

कॅमेरामनला लागण

एका खासगी वाहिन्याच्या 27 वषीय कॅमेरामनचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्याला हालभांवी येथील कोविड-19 केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती धोक्मयाबाहेर आहे. या पार्श्वभूमीवर सदाशिवनगर परिसरातही सीलडाऊन करण्यात आले आहे. पोलीस, डॉक्टर, परिचारिकांच्या पाठोपाठ आता वाहिन्यांच्या कॅमेरामनलाही बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related Stories

अपहरणाच्या अफवांविरुद्ध पोलिसांची जोरदार जागृती

Amit Kulkarni

गुरुवारपेठेच्या मागील बाजूस कचऱयाचे ढिगारे

Amit Kulkarni

शहरवासियांचे लक्ष मनपाच्या निकालाकडे

Patil_p

शाळा सक्षम करण्यासाठी रोज एक रुपया

Patil_p

एकमेकांना जोडणारा दुवा म्हणजे भाषा

Patil_p

कित्तूर कुस्ती स्पर्धेत लक्ष्मी पाटील विजेती

Amit Kulkarni