Tarun Bharat

कोरोना लवकर जावूदे, सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे

Advertisements

बकरी ईदला मुस्लिम बांधवांची प्रार्थना ः मुस्लिम बोर्डिंग येथे पाच जणांच्या उपस्थितीत नमाज पठण

प्रतिनिधी / कोल्हापूर

शहरात कोरोना पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी साधेपणाने बकरी ईद साजरी केली. मुस्लिम बोर्डिंग येथे मोजक्याच बांधवांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले. मौलाना मोबीन यांनी नमाज व खुदबा पठण केले. यावेळी कोरोनाचा प्रादूर्भाव लवकर कमी येऊ दे, सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादर मलबारी, अश्किन आजरेकर व संचालक उपस्थित होते. तर अन्य मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण टाळत घरीच नमाज पठण करुन एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

  कोरोना संसर्गामुळे राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये धार्मिंक कार्यक्रमांना बंदी आहे. बकरी ईदला मुस्लिम बांधव सामुदायिक नमाज पठाण करतात. त्यामुळे प्रशासनाने बकरी ईद साधेपणाने साजरी करत नमाज पठण घरीचे करण्याचे आवाहन केले होते. मुस्लिम बोर्डिंग येथे प्रतिवर्षी रमजान व बकरी ईदला सामुदायिक नमाज पठण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या सणाला येथे मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी होते. मात्र कोरोना संसर्गामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही येथे सामुदायिक नमाज पठण झाले नाही. केवळ पाच जणांच्या उपस्थितीत येथील सामुदायिक नमाज पठणची परंपरा कायम ठेवण्यात आली.

   त्यागाचे प्रतिक म्हणून बकरी ईद मुस्लिम बांधव संपूर्ण देशात साजरी करतात. यावेळी बकऱयाची कुर्बानी देण्याची परंपरा आहे. त्यानुसार शहरात आज बकरी ईदला अनेक मुस्लिम बांधवांनी बकऱयांची कुर्बानी दिली. ईदनिमित्त मिरज, देवनार, निपाणी, रायबाग, मुधोळ येथून बकऱयांची खरेदी केली जाते. बाराईमाम येथील सोहेल जामदार यांनी कुर्बानीसाठी तब्बल 1 लाख 10 हजार रुपयांचा बकरा खरेदी केला होता. तसेच अन्य सातशेहून अधिक मुस्लिम बांधवांनी 30 ते 40 हजार रुपये मोजून बकऱयांची खरेदी केली होती. त्यांच्याकडून बुधवारी बकरी ईदला या बकऱयांची कुर्बानी देण्यात आली.

Related Stories

गौराई वनस्पती झाली दुर्मिळ

Archana Banage

कोल्हापूर विमानतळावरून कार्गो सेवेला मंजुरी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : करवीर तहसीलदारांच्या करवीर तालुक्यातील गावांना भेटी

Archana Banage

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर शाहुवाडी पोलीसात गुन्हा नोंद

Archana Banage

कोनोली पैकी पानारवाडीत पतीचा पत्नीकडून खून

Archana Banage

शिवरायांनाही रोखण्याचे प्रयत्न झाले होते

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!