Tarun Bharat

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पुन्हा झळकणार मोदींचा फोटो

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो झळकणार आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून पुन्हा तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यांमधील कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्रांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्याचे निर्देश दिले आहेत.

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. दरम्यान, या निवडणुकीच्या काळात 8 जानेवारीपासून कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटविण्यात आला होता. आता या प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो पुन्हा झळकणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी तसे आदेश दिले आहेत. पाच राज्यांच्या को-विन प्लॅटफॉर्ममध्येही आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात शुक्रवारी 1660 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.25 टक्क्मयांवर आला आहे, तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 0.29 टक्के इतका आहे. आतापर्यंत 4,24,80,436 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के इतके आहे. महामारीपासून बचाव करण्यासाठी लसीकरणही सुरू आहे. आतापर्यंत एकूण 182.87 कोटी डोस देण्यात आले आहेत. देशातील प्रौढ लोकसंख्येबरोबरच बालकांच्या लसीकरणाचे कामही वेगाने सुरू आहे.

Related Stories

काँग्रेसच्या उमेदवारांची यादी आज

Patil_p

पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष अटकेत

datta jadhav

टुलकिट प्रकरण; भाजप नेते संबित पात्रांवर ट्विटरची कारवाई

Archana Banage

उत्तर प्रदेशच्या आरोग्यमंत्र्यांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

डॉ. आंबेडकरांचे विचार तरूणांना दिशादर्शक

Archana Banage

कोल्हापूरात ओमिक्रॉनचे आणखीन तीन रूग्ण

Abhijeet Khandekar