Tarun Bharat

कोरोना लसीकरण मोहिमेत देशाचा नवा विक्रम

ऑनलाईन टीम/ नवी दिल्ली

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सध्या लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. या लसीकरण मोहिमेत देशाला मोठे यश आले आहे. कोरोना लसीकरणामध्ये भारताने काल, शुक्रवारी नवा विक्रम केला आहे. एका दिवसात एक कोटी पेक्षा जास्त लसीकरणाचा मोठा उच्चांकी आकडा पार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या लसीकरण मोहिमेचे अभिनंदन केले आहे.

कोविन अॅपच्या आकडेवारीनुसार कोरोना लसीचे एक कोटी 64 हजार डोस नागरिकांना दिले. कोरोनाचे डोस हे 63,342 लसीकरण केद्रांवर देण्यात आले. या आधी भारतात 16 ऑगस्ट रोजी 92.39 लाख कोरोना लसीकरण यशस्वी झाले होते. कोविन अॅपच्या आकडेवारी नुसार शुक्रवारी उत्तर प्रदेश या ठिकाणी सर्वांत जास्त लसीकरण झाले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 28.62 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये 10 लाखांपेक्षा अधिक लसीकरण झाल्याची माहिती आहे. तर, महाराष्ट्रात 9 लाखाहून अधिक लसीकरण झाले. अजून पर्यंत कोणत्याही देशाला लसीकरणाचा इतका मोठा आकडा गाठता आला नाही. या वर्षअखेरीस डिसेंबर पर्यंत 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यासाठी भारताची वाटचाल सुरु आहे.

Related Stories

यूपी बोर्डाकडून परीक्षांची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी सुरू होणार 10वी,12 वीची परीक्षा

Tousif Mujawar

‘पाचारण’ केलेले अधिकारी दिल्लीची भेट टाळणार

Patil_p

पृथ्वीच्या दिशेने येतोय स्टेडियमएवढया आकाराचा लघुग्रह

datta jadhav

मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलचे दर अनलॉक केले : राहुल गांधी

Tousif Mujawar

हेलिकॉप्टर अपघातातून रविशंकर प्रसाद बचावले

Patil_p

जर्मनीच्या नेत्या अँजेला मर्केल निवृत्त

Patil_p