ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगभरात कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक देश कोरोनावर लस विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीतून अमेरिकेतून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.


अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनला कोरोनावरील लस विकसित करण्याच्या दिशेने अजून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. कंपनीने सांगितले की, ज्या स्वयंसेवकाला ही लस देण्यात आली होती, ते वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. ते अमेरिकेतील चौथे स्वयंसेवक आहेत जे वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अन्य नागरिकांना पुढे येऊन या चाचणीसाठी नोंदणी करण्याचे आवाहनही केले आहे.
यावेळी ट्रम्प म्हणाले, अमेरिकेतील इतिहासात आर्थिक सुधारणांना सर्वात वेगाने आम्ही पुढे नेले आहेत. आमचा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. परंतु बिडेन हे विज्ञान विरोधी दृष्टीकोन असलेलेल व्यक्ती आहेत, असंही ट्रम्प म्हणाले.
बिडेन यांनी चीन आणि युरोपच्या प्रवासावर बंदी आणि त्यावर आखण्यात आलेल्या धोरणांचा विरोध केला. त्यांच्याकडे कधीही न संपणारा लॉकडाउन आहे. परंतु आम्ही लॉकडाउन लागू करत नाही. आमची योजना विषाणूवर विजय मिळवण्याची असून बिडेन यांच्या योजना अमेरिकेसाठी घातक असल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.