Tarun Bharat

कोरोना ला हरवून टाकायचं हाय” चिमुकली सई घालतेय साद..

प्रतिनिधी/ सातारा

विषाणूच्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर शासन, प्रशासनासह अनेक घटक समाजप्रबोधन करीत आहेत.या कार्यामध्ये चिमुकली मंडळीही मागे नाहीत.त्यापैकीच एक नाव सध्या गाजत आहे.ते म्हणजे सई विनोद बडेकर, ही पाच वर्षाची चिमुरडी होय.पाटण तालुक्यातील गुढे येथील सई आपल्या कलेद्वारे विषाणूंचा प्रादुर्भाव याविषयी जनजागृती करीत आहे.सध्या तिची कविता तसेच ;भाषण खूप गाजत आहे आणि लोकांच्या मनाला भावत आहे.विशेष म्हणजे  वक्तृत्व अथवा काव्यगायन हे केवळ पाठांतर केलेले वाटत नसून चेहयावरची भावनासुद्धा मनाला साद घालत आहेत.रडायचं नाही, हरायचं नाही; उलट कोरोना विषाणूला हरवायचं आहे, अशी ती आर्त साद जनतेला घालत आहे.तिने त्यासाठी सुंदर उदाहरणेही दिली आहेत .जेव्हा अफजलखानाने स्वारी केली तेव्हा तो सहा महिने प्रतापगडाच्या तळाशी मुक्काम ठोकून होता .परंतु; त्या वेळेला संयम ठेवून आणि गनिमीकाव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा मुकाबला केला असे उदाहरण तिने दिले आहे.तिची कविता अत्यंत अर्थपूर्ण आहे .तिने एक अत्यंत मर्मभेदी उदाहरण आणखी दिले आहे .ते म्हणजे; आईच्या पोटात आपण नऊ महिने थांबलो.आईने आपल्याला पोटातच सांभाळले .मग आपण नंतर व्यवस्थित जगण्यासाठी आणि विषाणूचा मुकाबला करण्यासाठी काही दिवस घरात थांबू शकत नाही का? असा सवाल तिने रोखठोकपणे जनतेला विचारला आहे.शत्रू दारात उभा आहे, त्याला संयम आणि गनिमी काव्याने हरवले पाहिजे.असे ती सांगते .इतकेच नव्हे; तर ही पाच वर्षाची चिमुरडी “सरकारला साथ द्या” असे आवाहन देखील करत आहे.आरोग्य कर्मचारी, नर्स, अधिकारी हे सर्वजण आपल्यासाठी लढत आहेत.त्यांना आपण घरातच बसून धन्यवाद मानले पाहिजेत.असे देखील सांगायला ती विसरत नाही.केवळ पाच वर्षाच्या वयात अचुक शब्दफेक आणि जे सांगायचे आहे जो संदेश ठामपणे द्यावयाचा आहे त्याबाबतीत आपुलकी आणि उत्कृष्ट हावभाव याचा सुंदर मिलाफ तिच्या सादरीकरणात दिसून येत असल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या कलेचा वापर प्रबोधनासाठी कसा करावा याची जणू तिने उदाहरणच घालून दिले आहे.

Related Stories

दया नायक यांच्या गोंदियातील बदलीला मॅटकडून स्थगिती

Archana Banage

जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये रेन वॉटर हारवेस्टींग प्रकल्प

Patil_p

शेतकऱ्याच्या फसवणूक प्रकरणी आंधप्रदेश येथून एकास अटक

Archana Banage

वेळू येथील जवान प्रशांत भोसलेंचे मध्यप्रदेशमध्ये निधन

Patil_p

लक्ष्मण माने, घरतांवर गुन्हा दाखल होण्यासाठी आंदोलन

Patil_p

सातारा जिल्ह्यात कोरोना स्थिती गंभीर : सोमवारी १७० बाधित, ४ बळी

Archana Banage