Tarun Bharat

कोरोना विषाणूची निर्मिती चीनकडूनच !

ब्रिटीश गुप्तचरांनाही सापडले पुरावे, आता मागणी कठोर कृतीची 

लंडन / वृत्तसंस्था

जगभरात धुमाकूळ घालणाऱया कोरोना या विषाणूची निर्मिती चीनच्याच शास्त्रज्ञांनी केली आहे, हे आता जवळजवळ सिद्ध झाले आहे. अमेरिका आणि फ्रान्स पाठोपाठ ब्रिटीश गुप्तचरांनीही यासंबंधीचे ठोस पुरावे सापडल्याचे प्रतिपादन केले असून त्यामुळे चीनवर कठोर कारवाईची मागणी जगभरातून केली जात आहे. ब्रिटीश संशोधकांनी यासंदर्भात चीनवर थेट आरोप केला आहे.

ब्रिटीश गुप्तचरांनी केलेल्या नव्या अन्वेषणात ही बाब स्पष्ट झाली. ज्या सार्स-कोव्हीड-2 (2002 मध्ये या विषाणूचा उदेक झाला होता) याच विषाणूपासून सध्याचा कोरोना विषाणू निर्माण करण्यात आला आहे, त्या सार्स विषाणूचा कोणीही नैसर्गिक वंशज नसल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. वुहान या शहरात चीन सरकार पुरस्कृत जैव प्रयोगशाळा आहेत. तेथे काम करणाऱया शास्त्रज्ञांनी कोरोनाची निर्मिती हेपुपुरस्सर केली आहे. हेतुपुरस्सर लाभ प्रयोग (गेन ऑफ फंक्शन) या प्रकल्पांतर्गत ही निर्मिती करण्यात आली, असे स्पष्ट होत आहे.

अशी केली निर्मिती 

ब्रिटनमधून प्रसिद्ध होणाऱया डेली मेल या प्रसिद्ध वृत्तपत्रात या संबंधीचा सविस्तर वृतांत प्रसिद्ध झाला आहे. हे संशोधन ब्रिटीश प्राध्यापक डल्गलिश आणि नॉर्वेचे शास्त्रज्ञ डॉ. बिर्जर सोरेन्सेस यांनी पेले आहे. चीनमधील शास्त्रज्ञांनी कोरोनासदृश नैसर्गिक विषाणूचा ‘सांगाडा’ उचलला आणि त्याला कृत्रिम प्रोटीनचे टोक (स्पाईक) जोडून कोरोना विषाणू बनविला, असे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

हानी पोहचविण्याच्या हेतूनेच…

चीनी शास्त्रज्ञांचा हा प्रयोग केवळ अभ्यासासाठी किंवा नवी औषधे शोधण्यासाठी नव्हता. तर विनाश घडविण्यासाठीच होता. म्हणूनच हा विषाणू प्रयोगशाळेतून ‘निसटल्या’ची माहिती जगापासून चीनने लपविली. त्यायोगे कोरोनाचा प्रसार जगभर होऊ दिला. आपला धाक बसविण्यासाठी हे चीनने केले असावे असा आरोपही अनेक संशोधकांनी केला असून त्यामुळे जगभर खळबळ उडाली आहे.

हेपुपुरस्सर लाभ प्रयोग म्हणजे काय?

गेन ऑफ फंक्शन किंवा हेतुपुरस्सर लाभ प्रयोग याचा अर्थ एकाद्या विषाणूत हेतुपुरस्सर जनुकीय परिवर्तन घडवून आणणे असा आहे. विशिष्ट लाभ मिळविण्यासाठी हा प्रयोग केला जातो. नैसर्गिक विषाणूपेक्षा अधिक क्षमतेचा विषाणू या पद्धतीने कृत्रिमरित्या तयार करण्याचा मूळ उद्देश त्यावर प्रयोग करून नवी अधिक प्रभावी औषधे तयार करणे हा असतो. तथापि, चीनने या मूळ उद्देशाला बाजूला सारून जगात भीती निर्माण करण्यासाठी या कृत्रिम विषाणूचा उपयोग केला  असा आरोप आता होत आहे. यावर प्रगत देशांमधील गुप्तचर संस्था अधिक अन्वेषण करीत असून आगामी काही महिन्यांमध्ये सत्य बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता चीनवरच लक्ष केंद्रीत केले जात आहे.

Related Stories

कोरोनामुळे मृत्यू होण्यास अन्य आजार जबाबदार – संशोधकांचा दावा

Patil_p

उइगूर मुस्लीम महिलांचे मुंडन करवतोय चीन

Patil_p

ब्राझीलमध्ये स्थिती बिघडली

Patil_p

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज

prashant_c

ब्रिटन अन् चीनमधील तणावात वाढ

Patil_p

अमेरिकेत अपहरण झालेल्या भारतीय वंशाच्या कुटुंबाच्या हत्येने खळबळ

Archana Banage