Tarun Bharat

कोरोना विषाणू पूर्णपणे नष्ट होणे अशक्य : WHO

Advertisements

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

मागील सहा महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा विषाणू पूर्णपणे नष्ट होणे अशक्य असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. माईक रेयान यांनी म्हटले आहे. 

रेयान म्हणाले, जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. रोज लाखो लोक संक्रमित होत आहेत. तर हजारो लोक मृत्यू पावतात. सध्याची परिस्थिती पाहता हा विषाणू नष्ट होणे अशक्य आहे. त्यामुळे लोकांना कोरोनासोबत जगण्याची सवय करून घ्यावी लागेल. 

कोरोना कधी नष्ट होईल, हे आपण सांगू शकत नाही. मात्र, त्यापासून आपण आपला बचाव करू शकतो. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशात लॉकडाऊन सुरू आहे. काही देशात अंशतः लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळेच अनेक देशात कोरोना नियंत्रणात आहे, असेही रेयान यांनी म्हटले आहे.

Related Stories

“भविष्यात भगवा ध्वज राष्ट्रध्वज बनू शकतो, सध्या तिरंग्याचा आदर करा”

Archana Banage

इचलकरंजीचा बालगायक सिद्धांत बनला रिऍलिटी शोचा रॉकस्टार

Abhijeet Khandekar

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात आरोग्याचा महायज्ञ

Abhijeet Khandekar

युवतीला दररोज 30 वेळा होते उलटी

Patil_p

तालिबानला मान्यता मिळवून देण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान

Patil_p

पाक सैन्यांच्या गोळीबारात भारतीय लष्कराचा JCO शहीद

datta jadhav
error: Content is protected !!