Tarun Bharat

‘कोरोना वॉरियर्स’ स्मारकाच्या बांधकामाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Advertisements

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकमध्ये कोरोना काळात सेवा बजावताना प्राण गमावलेल्या योद्ध्यांच्या सन्मानार्थ एक स्मारक (कोविड वॉरियर मेमोरियल) बांधले जात आहे. डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांच्या सन्मानार्थ बेंगळूरमध्ये त्याचे पहिले भव्य कोविड योद्धा स्मारक बांधण्याचे काम सुरु आहे. या स्मारकाच्या कामाचा कर्नाटकचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी आढावा घेतला.

दरम्यान, आरोग्यमंत्र्यांनी शुक्रवारी राज्यातील महामारीमुळे आपला जीव गमावलेल्या ‘कोरोना वॉरियर्स’च्या प्रस्तावित स्मारकाच्या उभारणीवर शुक्रवारी चर्चा केली. “स्मारक हे आमच्या ‘कोरोना वॉरियर्स’च्या निस्वार्थ सेवेसाठी आदरांजली ठरेल आणि ते सर्व तरुण डॉक्टर आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी प्रेरणास्रोत ठरेल,’ असे त्यांनी या विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर सांगितले.

Related Stories

कर्नाटक: काँग्रेसचे उमेदवार टी. बी. जयचंद्र यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Abhijeet Shinde

सीबीएसई १२ वी बोर्ड परीक्षा रद्द : कर्नाटक लवकरच द्वितीय पीयू परीक्षेबाबत घेणार निर्णय

Abhijeet Shinde

कर्नाटक उच्च न्यायालयाचे ‘हे’ आहेत ६ स्थायी न्यायाधीश; एससी कॉलेजियमने दिली मान्यता

Abhijeet Shinde

कर्नाटक: डी. के. शिवकुमार कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बेंगळूर पोलिसांचा छापा

Abhijeet Shinde

कोरोना योद्धय़ांसाठी ‘चैतन्य केंद्र’

Amit Kulkarni
error: Content is protected !!