Tarun Bharat

कोरोना संकटात गणपतीच्या चमत्काराचा विश्वास

मूर्ती सजविण्याचे काम उत्साहात

प्रतिनिधी / पणजी

राज्यात कोरोनाचे संकट वाढत चालले आहे. त्यामुळे गणेश चतुर्थी सणाबाबत भाविकांमध्ये मोठी चिंता आहे. तरीही तेवढय़ाच उत्साहाने सध्या गणपती शाळांमध्ये गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू आहे. बऱयाच गावामध्ये गणपतीच्या शाळा आहेत. सध्या चित्रकार गणपतीच्या मूर्ती बनविण्यात व्यस्त आहेत. कोरोनाचे संकट अधिक गडद होणार याचा संशय असला तरी भावनिक आणि भक्तीची आस हृदयात बाळगून मोठय़ा विश्वासाने गणपती करण्याचे काम सुरू आहे.

कोरोनाचा हाहाकार सुरूच आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्ण मृत्यूमुखी पडण्याचे प्रकारही वाढत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सव मर्यादित स्वरुपात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक भागात पुरोहितांनीही घरातील गणपती पूजन स्वतः घरातील व्यक्तींनीच करावे, असेही सूचित केले आहे.

गोव्यात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. दीड दिवसांपासून पाच, सात, नऊ, अकरा आणि एकवीस दिवसांपर्यंत गणेशोत्सव चालतो. कार्यक्रमांची रेलचेल, दारुकामाची आतषबाजी, बँडपथकांचे कार्यक्रम आणि दिंडी पथकांचे जयघोष असे अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात. गणेशोत्सव हा अमाप उत्साहाचा सण. पण यंदा कोरोना महामारीने या उत्साहावर विरजण टाकले आहे. 22 ऑगस्ट रोजी राज्यात गणेशोत्सव होणार आहे. अवघे दिवस राहिले आहेत. दुसऱया बाजूने कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे अशा वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह राहणार नाही, याची जाणीव सर्वांनाच आहे. तरीही विघहर्त्या गणरायाच्या आगमनासाठी आणि भक्तिभावाने हा उत्सव साजरा करण्यासाठी मोठय़ा विश्वासाने राज्यात गणेशमूर्ती सजविण्याचे काम सुरू आहे. विघ्नहर्ता गणराय कोरोना महामारीच्या संकटातून वाट दाखवील व या संकटातून तारून नेईल, असा विश्वास वयस्क, जाणत्या व्यक्तींच्या तोंडून बाहेर पडतो. त्यामुळे तरुण मंडळी गणेशोत्सव दीड दिवसांचाच असे, असे गृहीत धरून काम करीत आहेत.

Related Stories

काजू फेणीवरील स्पेशल कव्हरचे प्रकाशन

Amit Kulkarni

काँग्रेस ओबीसी शाखा अध्यक्षपदी संदेश खोर्जुवेकर

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Patil_p

पणजी मनपाचा अर्थसंकल्प आज

tarunbharat

श्री रामदास संगीत सांस्कृतिक संस्थेचे पाऊल प्रशंसनीय

Amit Kulkarni

रितेश, रॉय नाईक यांचा भाजप प्रवेश निश्चित

Omkar B