Tarun Bharat

कोरोना संकटात योगा आवश्यक : तिजानी मोहम्मद बंदे

Advertisements

ऑनलाईन टीम / न्यूयॉर्क :

कोरोनामुळे लोकांमधील एकटेपण व अस्वस्थता वाढत आहे. अशा काळात योगपूरक जीवनशैली अत्यंत आवश्यक असल्याचे मत संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेचे अध्यक्ष तिजानी मोहम्मद बंदे यांनी येथे व्यक्त केले.

21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा कोरोनामुळे घालण्यात आलेले निर्बंध व फिजिकल डिस्टंन्सिंगच्या पार्श्वभूमीवर हा दिवस डिजिटल पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बोलताना तिजानी म्हणाले, कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सद्यःस्थितीत माणूस माणसापासून दूर गेला असून, एकटेपणा वाढत आहे. अनेकांना आर्थिक संकटांशीदेखील सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांचा त्रास वाढत आहे. एकीकडे कोरोनाची भीती, तर दुसरीकडे प्रियजनांची चिंता अशा दुष्टचक्रात लोक अडकले आहेत. अशा वेळी आपण शारीरिक व मानसिकदृष्टय़ा तंदुरुस्त असणे गरजेचे असून, योगातूनच हे शक्य होईल.

जीवनशैलीबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. किंबहुना आता नवी जीवनशैली आत्मसात करावी लागेल. अर्थात योगाद्वारे ही जीवनशैली आपल्याला अंगिकारता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

शिराळ्यात वाहतूक नियंत्रणावर नियोजन बैठक

Archana Banage

‘मी धमक्यांना भीक घालत नाही, माझं काम सुरूच ठेवणार’

Archana Banage

आरबीआयकडून केंद्राला 99,122 कोटींची मदत

Patil_p

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक; ‘या’ विषयांवर होणार चर्चा

datta jadhav

कर्नाटकात नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट

Archana Banage

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांपार

datta jadhav
error: Content is protected !!