Tarun Bharat

कोरोना संसर्गाच्या लक्षणांचा मांडला क्रम

Advertisements

जलद उपचाराकरता होणार मदत :

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

अमेरिकेच्या संशोधकांनी माणसांमधील कोविड-19 च्या संभाव्य लक्षणांचा क्रम शोधून काढला आहे. यांतर्गत कोरोना संक्रमित झाल्यावर सर्वप्रथम ताप, त्यानंतर खोकला, मांसपेशींमध्ये वेदना आणि नंतर अस्वस्थपणा किंवा उलटी होणे आणि पोट बिघडण्याची लक्षणे दिसून येतात. कोविड-19 लक्षणांचा क्रम जाणून घेतल्याने बाधिताला त्वरित उपचार मिळविण्यास किंवा लवकरात लवकर सेल्फ आयसोलेशनचा निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.

प्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ नावाच्या नियतकालिकात संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. यानुसार लक्षणांचा क्रम ओळखल्याने डॉक्टरांना बाधितांवरील उपचाराची योजना आखण्यास मदत मिळू शकते आणि हा आजार प्रारंभिक अवस्थेतच नियंत्रित करता येऊ शकतो. हा क्रम विशेषत्वे संबंधित व्यक्ती कोविड-19 च्या संसर्गाच्या लक्षणांप्रमाणे होणाऱया फ्ल्यू सारख्या आजारांचे चक्र कधी पार करत आहोत हे जाणून घेण्यास महत्त्वपूर्ण असल्याचे उद्गार दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक पीटर कुन यांनी काढले आहेत.

कोविड-19 च्या उपचारासाठी आता प्रभावी दृष्टीकोन उपलब्ध असून त्याद्वारे वेळीच ओळख पटवून रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाऊ शकते. ताप आणि खोकला बहुतांशवेळा विविध प्रकारच्या श्वसनाच्या आजारांशी संबंधित असतात, त्यात मिडिल ईस्ट रेस्पिरेटीर सिंड्रोम (मर्स) आणि सार्स सामील असल्याचे संशोधक जोसेफ लार्सन यांनी म्हटले आहे.

वरील गेस्ट्रोइनेस्टाइनल ट्रक्ट (अस्वस्थपणा/उलटय़ा होणे) खालच्या गेस्ट्रोइनेस्टिनल ट्रक्ट (पोट बिघडणे) पूर्वी प्रभावित होऊ लागतो, हे कोविड-19 चे लक्षण असून ते मर्स आणि सार्सच्या उलट आहे. चीनमध्ये 55,000 पेक्षा अधिक कोरोनाबाधितांच्या लक्षणांचा अभ्यास करून हा क्रम मांडला आहे.

Related Stories

राष्ट्रपती कोविंद गावी पोहोचताच भावूक ; माती कपाळावर लावत जन्मभूमीला केलं वंदन

Abhijeet Shinde

CBSE दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक 2 फेब्रुवारीला जारी होणार : शिक्षणमंत्री

Rohan_P

आत्मप्राप्ती

Patil_p

कायद्यांच्या पाठिंब्यासाठी सरसावले शेतकरी

Patil_p

तहान भागविणारा ‘मटका मॅन’

Patil_p

चीन आमचा सर्वात महत्वाचा भागीदार

Patil_p
error: Content is protected !!