Tarun Bharat

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ‘सनिटायझर टनेल’ची निर्मिती

गर्दीच्या ठिकाणी यंत्रणा बसवणार

प्रतिनिधी/ रत्नागिरी

राज्यातील कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे स्टेशन, बस स्थानक, भाजीपाला मार्केट, शासकीय कार्यालय, विद्यापीठ, हॉस्पिटल प्रवेशद्वार अशा गर्दीच्या ठिकाणी ‘टनल सॅनिटायझर’ची उभारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीने पुढाकार घेऊन अशा सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

   या टनेलमधून औषधयुक्त पाण्याच्या सुक्ष्म कणांचा फवारा व्यक्तींवर मारला जातो. यावेळी धुक्यातून गेल्याप्रमाणे अनुभव येतो.  दिल्ली, हरियाना, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांमध्ये सध्या याचा वापर सुरू आहे. भारतीय रेल्वेकडून हरियाणा येथे अशा प्रकारच्या टनेलची निर्मिती करण्यात आली आहे. या टनेलला फुमिगेशन टनेल असे म्हटले जाते. कर्नाटकातील हुबळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतही त्याचा उपयोग केला जात आहे. असाच प्रयोग राज्यातील महत्वाच्या गर्दीच्या ठिकाणांवर करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

डब्ल्यूएचओच्या निकषांवर निर्मिती 

डब्ल्यूएचओच्या व्यवसायिक मार्गदर्शक सूचनेनुसार इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या पुढाकाराने या टनेलची निर्मिती केली आहे. यामध्ये पाण्यात 1 ठक्के सोडियम हायपोक्लोराईडच्या मिश्रणाचा वापर केला जातो. टनेल मधून जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला 4 ते 5 सेकंदाची वेळ लागते. ज्या माध्यमातून निर्जंतुकीकरण केले जाते. अशा प्रकारच्या टनेलच्या निर्मितीसाठी 12 फुट लांबीच्या पोर्टा केबीनचा वापर केला गेला आहे. 

  नोजलद्वारे निर्माण होणाऱया धुक्यांचे अधिक चांगले वितरण सुनिश्चित करण्यासाठी फ्लूड फ्लो सिस्टम अँनसिस (एएनएसवायएस) या कार्यक्षम सॉफ्टवेअरमध्ये डिझाइन आणि सिम्युलेट केले गेले आहे. द्रवपदार्थ प्रमाणे दोन फ्लूड प्रणालीच्या पद्धतीचा वापर यात होतो. डिक्रिट पार्टिक्युलेट मॉडेल (डीपीएम) चा उपयोग सीएफडी मॉडेलमधे वापरून द्रवपदार्थ कसा सर्वत्र कसा पोहचेल हे पाहिले जाते.

  कोरोनाशी लढा देण्यासाठी कमी खर्चात या अभिनव उपकरणांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखला जाणे शक्य होईल, पण ज्या लोकांना काही अलर्जी आहे, त्यांनी यामध्ये प्रवेश करणे योग्य राहणार नाही असे सामंत यांनी सांगितले. या टनेलनिर्मितीसाठी इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित, शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाचे प्राध्यापक राजेंद्र सोनकवडे, प्रा. सचिन मठपती व त्यांचे विद्यार्थी विक्रम कोरपाले यांनी संशोधन करून ह्या उपकरणाचे डिझाईन केले आहे. या अभिनव उपक्रमाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  सामंत यांनी या प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Related Stories

रत्नागिरी : दापोलीत व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

Archana Banage

गडगडाटासह अनेक भागात पाऊस

NIKHIL_N

‘ज्ञानदीप’च्या दोघांना बाळासाहेब कडोलकर यांच्याकडून पुरस्कार

Patil_p

ठाकरे सरकार अख्ख्या मंत्रिमंडळाची बैठक जेलमध्ये आयोजित करतील असं वाटू लागलंय

Anuja Kudatarkar

आचरा येथे युवकाची आत्महत्या

NIKHIL_N

आमदार राणेंकडून आरोग्य केंदांना रॅपिड टेस्ट कीट

NIKHIL_N