Tarun Bharat

कोरोना संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी वैद्यकीय साहित्य मिळावे : खासदार माने

Advertisements

वार्ताहर / टोप
‘कोरोना’संसर्ग प्रतिबंध आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले ‘3 प्लाय मास्क’, ‘एन 95 मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्‌स्‌’, ‘टेस्टींग किट्‌स्’, ‘व्हेन्टीलेटर्स’, ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क, तसेच अन्य वैद्यकीय साहित्य, वस्तू, उपकरण हातकणंगले लोकसभा मतदार संघातील आरोग्य विभागाला मिळावीत अशी मागणी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात दिलेली माहिती अशी, देशात ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक पद्धतीने वाढत आहे. महाराष्ट्रात ही संख्या नियंत्रणात रहावी, ‘कोरोना’ प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्यशासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे. याबाबत शासनाचे अभिनंदन. माझ्या हातकणंगले लोकसभा मतदार संघामध्ये कोल्हापूर जिल्हयातील हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा व सांगली जिल्हयातील वाळवा व शिराळा या तालुक्यांचा सामवेश आहे. यामध्ये इचालकरंजी, पेठवडगाव, मलकापूर, हुपरी, जयसिंगपूर, कुरंदवाड, शिरोळ, पन्हाळा, मलकापूर, इस्लामपूर, आष्टा, शिराळा यासारख्या मोठया शहरांचा व ग्रामीण भागातील शेकडो गावांचा समावेश आहे. मतदार संघातील इस्लामपूर, ता. वाळवा येथे २४ व पेठवडगाव, ता. हातकणंगले येथे एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला आहे. आरोग्य विभाग व प्रशासनाच्या वतीने ‘कोरोना’बाधित व संशयित रुग्णांच्या शोध घेऊन, त्यांना वेगळे ठेवून प्रत्येकावर स्वतंत्रपणे उपचार सुरु आहेत.
कोरोना रुग्णांची आणि प्रसार रोखण्याची संपूर्ण काळजी घेत जात आहे. ‘ट्रेस, ट्रॅक, टेस्ट ॲन्ड ट्रीट’ या मार्गर्शकतत्वांनुसार ‘कोरोना’विरुद्धचा लढा पूर्णशक्तीनिशी सुरु आहे. प्रत्येक विभाागाशी मी संपर्कात असून, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय साहित्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ‘3 प्लाय मास्क’, ‘एन 95 मास्क’, ‘पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट्‌स्‌’, ‘टेस्टींग किट्‌स्‌’, ‘व्हेन्टीलेटर्स’, हॅन्ड सॅनीटायझर, सोडीयम हायड्रोक्ललराईड सोल्यूशन, ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क, टॅबलेट, गमबूट तसेच अन्य वैद्यकीय साहित्य, वस्तू व उपकरण त्वरित मिळावीत. मतदार संघातील जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय आवश्यक साहित्यांची यादी निवेदनाासोबत जोडली आहे.

Related Stories

कोल्हापूरकरांची अशी ही माणुसकी, एनडीआरएफच्या जवानावर केले मोफत उपचार

Abhijeet Shinde

वॉटर एटीएम घोटाळा, ग्रा.पं.निधीवरून सभा गाजली

Abhijeet Shinde

Kolhapur : विद्यापीठ विकास आघाडी अगामी निवडणूक एकत्रित लढणार

Abhijeet Khandekar

वानखेडेंची खात्यांतर्गत चौकशी होणार

datta jadhav

जि. प. आरोग्यचे लेखा व्यवस्थापक सेवामुक्त

Abhijeet Shinde

#NashikOxygenLeak : बेपर्वाई झाली असेल तर सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं-राज ठाकरे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!