Tarun Bharat

कोरोना संसर्ग रोखण्यात देशातील व्यवस्था ‘फेल’

Advertisements

राहुल गांधींचा सरकारला ‘डोस’ -लोकांना मदत करण्याचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशात कोरोनाच्या दुसऱया लाटेने हाहाकार माजवला असताना कोरोनाची रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या कृतीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. देशातील व्यवस्था ‘फेल’ ठरत असल्यामुळे आता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाची कामे बाजूला ठेवून लोकांच्या मदतीसाठी उतरावे, अशी सूचना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.  

सोशल मीडियाच्या माध्यमातून मत व्यक्त करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘व्यवस्था फेल गेल्यामुळे आता जनहिताची गोष्ट करणे आवश्यक आहे. देश संकटात असताना जबाबदार नागरिकांची आवश्यकता आहे. काँग्रेस पक्षाच्या सर्व सहकाऱयांना माझी विनंती आहे की सर्व राजकीय कामे बंद करावी आणि फक्त लोकांची मदत करावी. शक्मय त्या प्रकारे लोकांचे दुःख दूर करावे’ असे ट्विट त्यांनी केले आहे. यापूर्वी जनसंपर्क व अनावश्यक प्रकल्पांवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्यावे’ असा टोमणा त्यांनी सरकारला उद्देशून मारला होता. सध्याची दुर्दशा असहनीय आहे. नजिकच्या दिवसांमध्ये कोरोनाचे संकट आणखी गंभीर होईल, याला तोंड देण्यासाठी देशाला तयार करायला हवे, असा सूचक इशारा देत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधलेला आहे.

Related Stories

भारत-ब्रिटनचा संरक्षण-सुरक्षेवर भर

Patil_p

देशात पाच दिवसात 2 लाख बाधित रुग्ण

datta jadhav

भारतात 1.80 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

कलबुर्गी-कोल्हापूर रेल्वेसेवेला प्रारंभ

Patil_p

काँग्रेस उमेदवारावर 24 तासांची प्रचारबंदी

Patil_p

वाराणसी ते बोगिबील दरम्यान क्रूझ सेवा

Patil_p
error: Content is protected !!