Tarun Bharat

कोरोना समस्येमुळे दोन बॅडमिंटनपटूंची माघार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतामध्ये कोरोनाच्या तिसऱया लाटेचा प्रसार झपाटय़ाने होत आहे. दरम्यान येथे सुरू असलेल्या चार लाख डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या योनेक्स-सनराईज पुरस्कृत इंडिया खुल्या आंतर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून रशियन बॅडमिंटनपटू ऍलिमोव्ह व डिव्हेलटोव्हा यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ऍलिमोव्ह कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळला.

मिश्र दुहेरीत द्वितीय मानांकित जोडीतील रशियाच्या रोडिऑन ऍलीमोव्ह याला कोरोनाची बाधा झाली त्याचप्रमाणे ऍलिमोव्हच्या संपर्कात आल्याने त्याची दुहेरीतील जोडीदार ऍलिना डिव्हेलटोव्हाने या स्पर्धेतून माघार घेतली. रशियाच्या जोडीने या स्पर्धेतून माघार घेतल्याने आता इडोनेशियाच्या यंग केई टेरी ही आणि वेई हेन टेन यांना अंतिम फेरीसाठी पुढे चाल मिळाली.

त्याचप्रमाणे बॅडमिंटनपटू ब्रायन यंगने प्रकृती अस्वास्थामुळे स्पर्धेतून माघार घेतली. महिला दुहेरीच्या प्रकारात रशियाच्या मेलकोव्हा आणि शेपोव्हॅलोव्हा यांनीही पाठदुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली. बुधवारी या स्पर्धेत सात बॅडमिंटनपटू कोरोना बाधीत आढळल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. यामध्ये भारताचा किदांबी श्रीकांत, अश्विनी पोनाप्पा, रितिका राहुल ठक्कर, ट्रेसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमन सिंग आणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे. भारताच्या मनू अत्री आणि धुव रावत यांना या स्पर्धेपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. या स्पर्धेदरम्यान प्रत्येकी दिवशी बॅडमिंटनपटूंची कोरोना चाचणी घेतली जात आहे. सदर स्पर्धा येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये के.डी. जाधव इनडोअर हॉलमध्ये सुरू आहे.

Related Stories

बांगलादेश-लंका कसोटी सामना अनिर्णित

Patil_p

सूर्याची चमक, भारताचा सहज विजय

Amit Kulkarni

लवलिना, निखत झरीन यांना सुवर्णपदक

Patil_p

जखमी नेमार दुसऱया सामन्यातून बाहेर

Patil_p

तेंडुलकर, संगकारा, जयवर्धने सर्वोत्तम फलंदाज : पनेसर

Patil_p

ऑस्ट्रेलियाचे पाकला 506 धावांचे कठीण आव्हान

Patil_p