सक्रिय रुग्णसंख्या 32791


प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसली तरीही बुधवारी त्यातल्यात्यात बाधितांच्या संख्येएवढेच रुग्ण कोरोनामुक्तही झाले आहेत असे समाधानकारक चित्र दिसून आले आहे. बुधवारी 2865 बाधित सापडले तर 2840 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे 24 तासातील प्रत्यक्ष बाधितांची संख्या ही केवळ 25 एवढीच म्हणवी लागेल.
दुसऱया बाजूने बळींचा संख्या मात्र मंगळवार प्रमाणेच बरीच मोठी दिसून आली. मंगळवारी 75 रुग्ण दगावले होते तर बुधवारी 70 जणांचे बळी गेले आहेत. राज्यात आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 127639 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत एकूण 92974 जण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 72.84 टक्के आहे. गत 24 तासात 334 जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले तर 2572 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. सध्या 32791 सक्रिय रुग्ण आहेत. मे महिन्याच्या 12 दिवसात आतापर्यंत 706 जणांचे बळी गेले आहेत तर वर्षभरातील बळींची संख्या 1874 एवढी झाली आहे.
केंद्रवार सक्रिय रुग्णसंख्या
डिचोली 795, सांखळी 1405, पेडणे 1295, वाळपई 910, म्हापसा 1579, पणजी 1870, हळदोणा 853, बेतकी 786, कांदोळी 1734, कासारवर्णे 277, कोलवाळ 732, खोर्ली 855, चिंबल 1251, शिवोली 1127, पर्वरी 1668, मये 337, कुडचडे 745, काणकोण 536, मडगाव 2842, वास्को 1022, बाळ्ळी 531, कासावली 990, चिंचिणी 499, कुठ्ठाळी 1339, कुडतरी 611, लोटली 862, मडकई 569, केपे 561, सांगे 566, शिरोडा 649, धारबांदोडा 649, फोंडा 1726 व नावेलीत 614 रुग्ण आहेत. त्याशिवाय रेल्वे, विमान आणि रस्तामार्गे आलेले 6 बाधित सापडले आहेत.