Tarun Bharat

कोरोना : WHO ने जारी केल्या नव्या गाईडलाईन्स

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

हवेतून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचा दावा मागील आठवड्यात 32 देशातील शास्त्रज्ञांनी केला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही ही बाब मान्य करत पुराव्यांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाचा हवेतून संसर्ग होऊ नये म्हणून, WHO ने नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

हॉटेल, रेस्टॉरंट, फिटनेस क्लब याठिकाणी सुद्धा कोरोना विषाणू पसरू शकतो, अशी शक्यता WHO ने व्यक्त केली आहे. त्यामुळे चांगले व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणीच जाणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सतत फेस मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि हॅन्ड वॉश करणे आवश्यक आहे. 

बंद खोलीत अधिक काळासाठी बाधित व्यक्ती राहिल्यासही कोरोना व्हायरसचा संसर्ग त्या ठिकाणी असलेल्या हवेतून पसरण्याची भीती WHO ने व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा ठिकाणांपासून दूर राहिले पाहिजे. तसेच अन्य कोणत्या ठिकाणांहून कोरोनाचा विषाणू पसरू शकतो, याबाबत WHO ची विविध देशातील शास्त्रज्ञांसोबत चर्चा सुरू आहे.

Related Stories

सुवर्णमंदिरात खलिस्तानी घोषणा, वादग्रस्त व्यक्तींची हजेरी

Patil_p

पंतप्रधानांसह खासदारांच्या वेतनात तीस टक्के कपात

prashant_c

क्लुझर वाहनाची मोटारसायकलला धडक : मामा-भाचे यांचा जागेवरच मृत्यू

Abhijeet Khandekar

UP सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री कमल वरूण यांचा कोरोनामुळे मृत्यू

datta jadhav

उज्ज्वल निकमांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट

Archana Banage

कर्नाटक: राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय ५ जून रोजी : मुख्यमंत्री

Archana Banage