Tarun Bharat

कोलंबसचा पुतळा प्रखर विरोधानंतर हटवला

Advertisements

मेक्सिको

 उत्तर अमेरिकेत महत्त्वाच्या चौकातील कोलंबसचा पुतळा अखेर तीव्र विरोधानंतर हटवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सदरचा पुतळा जागेवरून हटवून अन्यत्र स्थलांतरीत केला जाणार असल्याची माहिती सरकारच्यावतीने देण्यात आली आहे. सदरचा क्रिस्टोफर कोलंबसचा पुतळा मेक्सिको शहरातील महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्यावर चौकात बसवण्यात आलेला होता. याजागी आता मेक्सिकोतील मूळ निवासी महिला द यंग वुमन ऑफ अमाझाक हिचा पुतळा बसवला जाणार आहे. सदरच्या महिलेचा पुतळा जानेवारीत मेक्सीको शहरातील समुद्र तटाजवळ सापडला होता. पुरातत्व खात्याच्या अधिकाऱयांच्या मते सदरची महिला ही राजपरिवारातील असू शकते. तेव्हा हाच पुतळा चौकात बसवणे योग्य ठरणार असल्याचे मानून त्याप्रमाणे तो लवकरच बसवला जाणार आहे. 12 ऑक्टोबर 1492 साली कोलंबस अमेरिकेत प्रथम पोहचला होता.

Related Stories

इतिहासातील सर्वात मोठी वाईन फॅक्ट्री

Patil_p

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांपार

datta jadhav

…म्हणून पक्षातील चौघांसह 6 जणांना घातल्या गोळ्या

datta jadhav

तीन देशांमध्ये त्सुनामीचा धोका

Amit Kulkarni

3 पोलीस कर्मचाऱयांची फ्रान्समध्ये हत्या, चौथा गंभीर

Omkar B

ब्राझीलमध्ये बाधितांची संख्या 60 लाखांसमीप

datta jadhav
error: Content is protected !!