Tarun Bharat

कोलंबिया, पेरूमध्ये कोरोनाबाधितांनी गाठला 8 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / प्रेटोरिया : 

कोलंबिया आणि दक्षिण अमेरिकेतील पेरू या दोन देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने 8 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत कोलंबियाचा जगात पाचवा तर पेरूचा सहावा क्रमांक लागतो. 

कोलंबियात आतापर्यंत 8 लाख 06 हजार 038
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामधील 7 लाख 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 80 हजार 630 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2 हजार 220 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 25 हजार 296 जण दगावले आहेत.

पेरूमध्ये आतापर्यंत 8 लाख 142 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामधील 6 लाख 57 हजार 836 जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अजूनही 1 लाख 10 हजार 164 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 1357 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 32 हजार 142 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Related Stories

अमेरिकेत संक्रमण धोकादायक

Omkar B

अमेरिकेत स्थिती गंभीर

Patil_p

हाँगकाँग-संसर्गाची चौथी लाट

Patil_p

अल जवाहिरीचा अमेरिकेकडून खात्मा

Patil_p

इम्रान खान राजवटीत पाक जनता ‘गॅस’वर

Patil_p

भारत आणि जपान संरक्षण सहकार्य वाढवणार

Amit Kulkarni