Tarun Bharat

कोलकाता ते मुंबई न्यायमूर्तींचा तीन दिवस प्रवास

नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांचा आज शपथविधी

मुंबई -/प्रतिनिधी

टाळेबंदीमुळे हवाई आणि रेल्वे वाहतूक बंद असल्याने आजच्या शपथविधीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना कोलकाता ते मुंबई असा तीन दिवस प्रवास करून मुंबई गाठावी लागली.

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी सोमवारी निवृत्त झाल्याने कोलकाता उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठतेत दुसऱ्या क्रमांकावर असलेले न्यायमूर्ती दत्ता यांची गुरुवारी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

टाळेबंदीमुळे मुख्य न्यायमूर्ती पद बराच वेळ रिक्त राहू नये, म्हणून ते तातडीने स्वीकारण्याचे त्यांनी ठरवले. मात्र टाळेबंदी असल्याने शपथविधीला पोहोचायचे कसे, असा प्रश्न होता. त्यावर तोडगा म्हणून न्यायमूर्ती दत्ता यांनी कोलकाता ते मुंबई हा प्रवास रस्तेमार्गे करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शनिवारी सकाळी मुलासोबत कोलकाता ते मुंबई प्रवास सुरू केला व आज मुंबईत दाखल झाले.

Related Stories

निवडणूक आयुक्त गर्ग यांचा राजीनामा

Amit Kulkarni

अखेर जंबो हॉस्पिटलला लागले सिल

Patil_p

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा : अजित पवार

Tousif Mujawar

अनगोळ चव्हाटा देवळात दीपोत्सव उत्साहात

Omkar B

विजेच्या धक्क्याने मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

Patil_p

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी बेळगावच्या 4 मल्लांची निवड

Amit Kulkarni