Tarun Bharat

कोलवाळातील कैदी संपावर

प्रतिनिधी/ पणजी

कैद्यांना पॅरोलवर सोडत नल्याने गेल्या तीन दिवसांपासून कोलवाळ तुरुंगातील कैद्यांनी संप पुकारला आहे. गेले दोन दिवस कैद्यांनी खाण्यापिण्यावर बहिष्कार घातला असल्याने चार कैद्यांची प्रकृती बिघडली आहे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कैंद्यांना पॅरोलवर सोडणे बंधनकारक आहे. कोलवाळ तुरुंगातील अधिकाऱयांनी कैदी पॅरोलवर जाण्यास तयार नसल्याचे सागून कैद्यांना पॅरोलवर सोडणे टाळले आहे. ही माहिती कैद्यांना मिळताच त्यांनी  संप पुकारला आहे. सुमारे 400 कैदी आपल्या मतावर ठाम आहेत.

Related Stories

द. गोवा जिल्हा इस्पितळात कोविड इस्पितळ सुरू

Patil_p

कंत्राट नकोच, कायमस्वरुपी नोकरी द्या !

Patil_p

म्हादईवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीस शिक्षण खात्याकडून आडकाठी

Amit Kulkarni

पूराची स्थिती जाणून घेण्यासाठी राजन कोरगावकर यांनी दिली तिळारीला भेट

Amit Kulkarni

… अन्यथा ऑनलाईन शिक्षण बंदच करा

Amit Kulkarni

शिरोडा बाजारात बसचा थरार

Amit Kulkarni
error: Content is protected !!