Tarun Bharat

कोलवाळ तुरुंगात निकृष्ट जेवण आदी समस्या सोडवाव्यात

प्रतिनिधी/ म्हापसा

कोलवाळ तुरुंगात कैद्यांना बरोबर जेवण मिळत नाही. हे प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यावर या कैद्यांच्या कुटुंबियांनी कोलवाळ तुरुंगाकडे धाव घेऊन आपापल्या कुटुंबातील व्यक्तीची भेट घेतली व विचारपूस केली. आमच्या कुटुंबातील व्यक्तींना उत्कृष्ट दर्जाचे जेवण द्या अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान मंगळवारी दुपारी 5 कैदी व पाच मेस (जेवण बनविणारे) आणून दुपारच्या जेवणाची सोय केली. काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी कोलवाळ येथे जाऊन तुरुंगाची पाहणी करण्यासाठी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला मात्र परवानगी अभावी त्यांनी पणजी येथे तुरुंग महानिरीक्षकांची भेट घेऊन कोलवाळ तुरुंगात आरोपींना भेडसावणाऱया समस्यांची माहिती अधिकारी वर्गांना देऊन त्यांच्याशी चर्चा केली. येथील सर्व समस्या सोडवू असे आश्वासन सहाय्यक तुरुंग महानिरीक्षकांनी दिल्यावर ते माघारी फिरले.

दरम्यान यावेळी गोवा राज्य युवा काँग्रेस अध्यक्ष गोरख म्हार्दोळकर यांच्यासह जर्नादन भंडारी, साईश आरोलकर आदींनी पणजी येथे साहाय्यक तुरुंग महानिरीक्षक व्हिजिटींग कमिटी आहे त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून देखरेख समितीला घेऊन कोलवाळ तुरुंगाची पाहणी केली जाईल. येथे त्यांना जेवण बरोबर मिळत नाही म्हणून आम्ही रेशनकोटा त्यांना देऊ पाहत आहेत. जेवणाचा दर्जा या कैद्यांना निकृष्ट दर्जाचा दिला जातो याकडे अधिकाऱयांनी लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

भात, डाळीची आमटी देतात तेही योग्यरित्या देत नाही. कडधान्य तेथे देण्यात येते त्यांना ते तेथे योग्यरित्या का पोचत नाही? येथे काहीतरी गौंडबंगाल होते हे स्पष्ट आहे. देखरेख समितीची भेट घेऊन आम्ही तुरुंगाची चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अतिरिक्त तुरुंग महानिरीक्षकांनी आपण चौकशी करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे.

कोलवाळ तुरुंगात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याचे आणि त्यात स्वयंपाक घरातील पाच जणांना कोविडची लागण झाल्याचे कारण पुढे करून या तुरुंगातील एका सेलमधील अंडर ट्रायल कैद्यानी 3 दिवस येथील जेवण घेण्यास नकार दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान रात्रीच्यावेळी कोरोनामुळे दोघां रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा आझिलो इस्पितळात आण्यात आले आहे अशी माहिती देण्यात आली.

पाऊस संपत आला तरी अद्याप रेनकोट गोदामात पडून

पावसामुळे कोलवाळ येथील कैद्यांना गेल्या दोन महिन्यापूर्वी रेनकोट साटा स्टोअर प्रमुखाने आणून दिला आहे. मात्र येथील साहाय्यक अधीक्षक भानूदास पेडणेकर यांनी ते कैद्यांना वाटप केले नाही. सर्व रेनकोट गोदामामध्ये पडून आहेत. आता नाही तर आम्हाला रेनकोट पुढच्या वर्षी देणार काय? असा प्रश्न येथील कैद्यांनी उपस्थित केला आहे.

0908map 9

म्हापसा : साहाय्यक तुरुंग महानिरीक्षक आशितोष आपटे यांच्याशी चर्चा करताना गोवा युवा काँग्रेस अध्यक्ष ऍड. वरद म्हार्दोळकर, सरचिटणीस जनार्दन भंडारी आदी.

Related Stories

मांद्रे येथील देवी महालक्ष्मीचे पूजन

Patil_p

पेडणेची प्रसिद्ध पुनव आज

Amit Kulkarni

अडथळय़ांमुळे चोर्ला महामार्ग बनला धोकादायक

Amit Kulkarni

वादी-प्रतिवाद्यांना सादर करावे लागणार प्रतिज्ञापत्र

Amit Kulkarni

आयएसएलमध्ये बांबोळीत आज जमशेदपूरचा सामना चेन्नईनशी

Amit Kulkarni

पणजीतील खड्डे त्वरित बुजवा

Omkar B