Tarun Bharat

कोलवेकर यांचा विजय हा भाजपासाठी योग्य धडा

Advertisements

मगो नेते सुदिन ढवळीकर यांची टिका

प्रतिनिधी / फेंडा

भाजपाचे फोंडा गटाध्यक्ष शांताराम कोलवेकर यांची फोंडा पालिकेवर नगराध्यक्षपदी झालेली निवड हा भाजपासाठी मोठा धडा आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून इतर पक्षातून आलेल्या लोकांना नेतृत्त्वाची संधी देण्याचे भाजपाने अवलंबिलेले राजकारण भाजपाला अधोगतीकडे नेणार आहे. फोंडय़ातून त्याची सुरुवात झाली असून येणाऱया काळात संपूर्ण गोव्यात त्याची प्रचिती येणार आहे, अशी टीका मगो पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

 मगो व गोवा फोरवर्डच्या पाठिंब्याने फोंडा पालिकेवर नगराध्यक्षपदी निवडून आलेले फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर यांचे सुदिन ढवळीकर यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांना पाठिंबा दिलेले नगरसेवक व फोंडय़ातील मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांचा फोंडा पालिकेवर परिवर्तन घडवून आणण्यासाठी मोलाचा वाटा असल्याचा उल्लेख बांदोडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ढवळीकर यांनी केला. कोरोना महामारीने उच्चांक गाठलेला असताना फोंडा पालिकेवर नेतृत्व बदल घडवून आणण्याचे कृत्य लोकांना अजिबात आवडले नव्हते. नगरसेवकांनाही ते योग्य वाटले नाही. त्यामुळेच भाजपाला योग्य धडा मिळणे गरजेचे होते. तो त्यांना मिळाला असून खालच्या पातळीवरील हे राजकारण त्यांच्या अंगलट आले आहे. शांताराम कोलवेकर सारख्या भाजपाच्या खंद्या व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना बाजूला करण्यापेक्षा त्यांना पक्षात योग्य स्थान व न्याय कसा मिळेल याचा भाजपाने विचार करण्याची गरज आहे, असे ढवळीकर म्हणाले. फोंडा शहरातील नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविताना चांगल्या प्रकारे विकास साधण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नुकत्याच झालेल्या वादळात ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांच्यापर्यंत मदतकार्य पोचविण्याचे आवाहनही केले. यावेळी शांताराम कोलवेकर व डॉ. केतन भाटीकर उपस्थित होते.

Related Stories

स्मृती इराणी यांना मंत्रिमंडळातून डच्चू द्या

Patil_p

सागरी पर्यटन व्यवसायाला अच्छे दिन

Amit Kulkarni

दामु नाईक यांनी गोमंतकीयांची माफी मागावी

Patil_p

आमोणे येथील आश्रम शाळा, लोकोत्सवाचे आज उद्घाटन

Omkar B

जॉन डायसवर चांदर येथे अंत्यसंस्कार

Patil_p

छाननीनंतर 451 उमेदवार पात्र

Amit Kulkarni
error: Content is protected !!