Tarun Bharat

कोलिन पॉवेल यांचे निधन

वॉशिंग्टन / वृत्तसंस्था

अमेरिकेचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री कोलिन पॉवेल यांचे कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या समस्यांमुळे निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे. ते 84 वर्षांचे होते. 1989 मध्ये ते अमेरिकेच्या तीन्ही सेनांचे प्रथम ‘काळे’ प्रमुख बनले. त्यांनी अमेरिकेचे पनामावरील आक्रमण आणि इराकच्या तावडीतून कुवेतची सोडवणूक या मोहिमा यशस्वी करुन दाखविल्या. नंतर जॉर्ज बुश (धाकटे) यांच्या काळात ते अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बनले.

मात्र, याच काळात इराकवरील अमेरिकेच्या दुसऱया आक्रमणामुळे ते वादग्रस्तही झाले होते. इराकने गुप्तपणे रासायनिक शस्त्रे मिळविली असल्याची चुकीची माहिती त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला दिली आणि इराकवर आक्रमण करण्याचा अधिकार अमेरिकेला मिळवून दिला. मात्र, नंतर इराकजवळ अशा प्रकारची महासंहार घडवून आणणारी शस्त्रे नसल्याचे स्प़ष्ट झाल्याने त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती. त्यांच्या निधनामुळे अमेरिकेने एक द्रष्टा आणि कष्टाळू नेता गमावला अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश (धाकटे) यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

ग्रीसमध्ये दोन रेल्वेगाडय़ांची टक्कर, 32 बळी

Patil_p

हॉलीवूड अभिनेता अँड्र्यू जॅकचा करोना व्हायरसमुळे मृत्यू

prashant_c

फिलिपाईन्समध्ये जहाजाला लागली आग

Patil_p

पाण्यावर तरंगणारे अनोख्या माशासारखे शहर

Amit Kulkarni

बांगलादेशात बस अपघातात 17 ठार

Patil_p

अमेरिकेत आणखी एका कृष्णवर्णीयाच्या मृत्यूवरून वाद

Patil_p