Tarun Bharat

कोल्हापुरचा शिवसैनिक काँग्रेसलाच मतदान करेल-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘ताराराणीं’च्या भुमीतून पहिली महिला आमदार विधानसभेत

कोल्हापूर प्रतिनिधी

काश्मिरमध्ये सत्तेसाठी मेहबुबा मुफ्तींसोबत गेलेल्या भाजपचे हिंदूत्व सोयीनुसार बदलणारं हिदूत्व आहे. त्यामुळे शिवसेनेला भाजप नेत्यांनी हिंदूत्व शिकवू नये. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना निवडून आणण्याचा शब्द शिवसेनेने दिला आहे. त्यांचा विजय हा शिवसेनेचा विजय आहे. कोल्हापुरातील शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कडवट शिवसैनिक आहे. तो कोल्हापुरवरील शिवसेनेचा हिंदूत्वाचा भगवा कधीही पुसू देणार नाही. त्यामुळे कोल्हापुरातील शिवसैनिक काँग्रेसलाचा मतदान करेल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ हॉटेल पॅव्हेलियन येथे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणारा अन्याय हिंदूत्वाचा पेटंट सांगणाऱ्या भाजपला दिसला नाही का. मराठी भाषिकांवर होणाऱया अन्यायाबाबत शिवसेनाच नेहमी रस्त्यावर उतरली आहे. यावेळी भाजप शिवसेनेसोबत का रस्त्यावर उतरला नाही. बेळगांव महापालिकेत घाणेरडे राजकारण करत महापालिकेवरील मराठी भाषिकांचा भगवा उतवरत भाजपने करंटेपणा दाखवला. चार राज्यात खोटनाटं सांगून सत्ता मिळविली. मात्र महाराष्ट्राच्या जनतेला भाजप फसवू शकणार नाही. महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात यशस्वी झाला आहे. भविष्यातही हा प्रयोग यशस्वी करायचा आहे. त्यामुळे उत्तरच्या पोटनिवडणुकीतही शिवसेनेचे हिंदूत्व महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्यासोबतच असेल असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार जयंत असगांवकर, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते.

भाजप प्रदेशाध्यक्षांना भाषेचा अभिमान नाही

भाजप प्रेदशाध्यक्ष कोल्हापुरचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील कर्नाटकमध्ये जावून जन्म घ्यावा तर कर्नाटकात असे वक्तव्य करतात. जिथले सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करते. तिथे जावून पाटील असे वक्तव्य करत असतील तर त्यांना मातृभाषा मराठी, शिवरायांचा भगवा याबाबत काहीही अभिमान नसल्याचे स्पष्ट होते, अशी टिका मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली.

ठाकरेंनीच भाजपला भगवा मार्ग दाखवला
गांधीवादी, जनसंघ, जनतापक्ष आणि भाजप अशी भाजपची वाटचाल राहिली आहे. यादरम्यान मराठी माणसाठी भगवा हातामध्ये घेवून रस्त्यावर उतरलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच भाजपला भगवा मार्ग दाखवला. या मार्गावरुनच आपण दिल्लीपर्यंत पोहचू शकतो, हे लक्षात आल्यानंतर भाजपने भगवा मार्ग स्विकारला. त्यामुळे शिवसेनेला भाजपन हिंदूत्व शिकवू नये, असा इशार ठाकरे यांनी दिला.

भाजपने पाठीत खंजीर खुपसला
भाजपला शिवसेनेबाबत आपुलकी असती तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढे जनाब लावण्याच पाप भाजपने केलं. मुंबई विमानतळाला बाळासाहेबांच नाव देण्याला भाजपनेच विरोध केला. समृद्धी महार्गालाही नाव देण्यास विरोध दर्शविला. महाविकास आघाडीने बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव दिले. तसेच शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत दिलेले वचन निवडणुकीनंतर मोडले. यावरुन भाजपचा भगवा हा सोयीनुसार बदलणार आहे, हे दिसून येत असल्याचा आरोपही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

रेशन शिजवायच का तसंच खायचं
कोरोना काळात देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी गोरगरीब जनतेला मोफत रेशन दिल्याच भाजप नेते सांगत आहे. त्यांनी रेशन दिल, सिलेंडर दिल मान्या आहे. मात्र गॅसचा दर इतका भडकला आहे की कष्टकरी वर्गाला सिलेंडर न परवडणार झाला आहे. मग आत या जनतेने मोफत दिलेल रेशन शिजवायच का तसच खायचं याच उत्तरही भाजप नेत्यांनी द्याव, असे आव्हान मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

Related Stories

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणी पातळी, कोयना धरणात 49.07 उपयुक्त पाणीसाठा

Archana Banage

टाटाने घेतला फोर्डचा कारखाना ताब्यात

Patil_p

एमपीएससीची परीक्षा घेतल्यास वाईट परिणाम

Archana Banage

साताऱयात विकेंडला ‘शटर डाऊन’

Patil_p

दापोलीतील पिसई आरोग्य केंद्रात दिली गेली संशयास्पद लस

Archana Banage

वारणेने चालू हंगामातील २०० च्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानीचे निवेदन

Abhijeet Khandekar