Tarun Bharat

कोल्हापुरात आज कोरोनाचे ४० बळी, १९१९ नवे रुग्ण

Advertisements

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हय़ात सोमवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 40 जणांचा मृत्यू झाला यामध्ये परजिल्हय़ातील तिघे आहेत. तसेच 1 हजार 919 नवे रूग्ण आढळून आले. तसेच 1 हजार 297 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 16 हजार 15 झाली आहे. जिल्हय़ात मृत्यूसंख्या व नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णसंख्या वाढली आहे.

जिल्हय़ात सोमवारी कोरोनाने 40 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 3 हजार 712 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 1 हजार 928, नगरपालिका क्षेत्रात 587, शहरात 749 तर अन्य 448 आहेत. मृतांमध्ये जिल्हय़ांतील 37 आहेत. दिवसभरात 1 हजार 297 कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 93 हजार 542 झाली आहे.

जिल्हय़ात गेल्या 24 तासांत 1 हजार 919 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 36, भुदरगड 68, चंदगड 63, गडहिंग्लज 86, गगनबावडा 13, हातकणंगले 189, कागल 53, करवीर 303, पन्हाळा 146, राधानगरी 26, शाहूवाडी 29, शिरोळ 29, नगरपालिका क्षेत्रात 220, कोल्हापुरात 433 तर अन्य 74 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 13 हजार 269 झाली आहे.

शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून सोमवारी 3 हजार 295 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 488 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 3 हजार 229 अहवाल आले. त्यातील 2 हजार 794 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 3 हजार 54 रिपोर्ट आले. त्यातील 2 हजार 258 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 9 हजार 578 स्वॅब रिपोर्ट आले.

कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण
आजचे बाधीत रूग्ण 433 1476 1919
आजपर्यतचे बाधीत 32662 70607 1,13,269
आजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1297 93542
दिवसभरातील मृत्यू 11 29 40
आजपर्यंतचे एकूण मृत्यू 749 2963 3712
दिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण
आरटीपीसीआर 688 2488 3295
अँटीजेन 435. 2794 3229
ट्रुनेट 796 2258 3054

Related Stories

आमदारांच्या घरांसाठी भीक मांगो आंदोलन

Abhijeet Shinde

खेबवडे येथे भिंत कोसळून दोन दुभती जनावरे गंभीर जखमी

Abhijeet Shinde

गोकुळ शिरगाव एस.टी.कॉलनीत आणखी तीन पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

गणरायाचे स्वागत शांततेत करा- अप्पर पोलीस अधीक्षक हिंम्मत जाधव

Abhijeet Khandekar

‘गोकुळने म्हैस दूध दर प्रति पॉईंट चाळीस पैसे करावे’

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सावंतवाडी वनक्षेत्रात वाघाकडून पुन्हा शिकार

Sumit Tambekar
error: Content is protected !!