Tarun Bharat

कोल्हापुरात एसटीवर दगडफेक; चालक जखमी

प्रतिनिधी / कोल्हापूर

कोल्हापूरसह राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. एसटी कर्मचारी आणि राज्यशासन यांच्यात समजोता झालेला नसुन अद्याप संप मिटलेला नाही. मात्र काही प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे. संप सुरू असताना ही एसटी सुरू केल्याने मिरजवरून कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या एसटीवर अज्ञाताकडून दगडफेक केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एसटी दर्शनी बाजुची काच फुटली आहे. ही घटना हातकणंगले तालुक्यात पुणे – बेंगलुर महामार्गानजीक घडली आहे. या दगडफेकीत एसटी चालक जखमी झाला आहे. तर यामुळे घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

या संपाची तीव्रता वाढली असुन गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातील एसटी सेवा ठप्प झाली आहे. राज्यभरात 900 पेक्षा अधिक एसटी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर आज कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा एसटी कर्मचाऱ्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड,गडहिंग्लज आणि गारगोटी आगारातील कर्मचाऱ्यांच्यावर अजुन ही कारवाईची टांगती तलवार आहे.


Related Stories

राधानगरी येथे ग्रामीण भागासाठी रुग्ण सेवा सुरू

Archana Banage

धार्मिक कार्यक्रमात धिंगाणा; महापुरुषाचा अवमान केल्याने शिवसेना आक्रमक

Archana Banage

साखर उद्योगातील भाजपाचे नेते काय करताहेत; राजू शेट्टी यांचा सवाल

Archana Banage

कोल्हापूरचा शाही दसरा शुक्रवारी रंगणार!

Archana Banage

दोनशे पाच वर्षांची परंपरा असणारी चांदे दिंडी पंढरपूरला रवाना

Archana Banage

उसाचा पाला पेटवताना नव्वद वर्षीय शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

Archana Banage