Tarun Bharat

कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊन

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्या व मृत्युदराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्री बारापासून रविवारी (दि.23)पर्यंत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या लॉकडाऊनमध्ये दूध सेवा व औषध सेवा वगळता सर्वच बंद ठेवण्यात येणार असल्याचे समजते. परंतु अधिकृत नियमावली ही गुरुवारी जाहीर केली जाणार आहे.

बुधवारी सकाळी व्हीडीओ कॉन्फरंसींगद्वारे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आदी आदी तर `व्हीसी’द्वारे जिह्यातील आमदार सहभागी झाले होते.    

यावेळी सर्वानुमते लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊनची नियमावली उद्या, गुरुवारी जाहीर केली जाणार आहे.

Related Stories

कडक निर्बंध लावायला भाग पाडू नका; मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा

Tousif Mujawar

शिवसेना भवन वा कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाही

datta jadhav

सातार्‍यात आज नवे चार कोरोना बाधित रुग्ण

Archana Banage

चिखलीकरांच्या मदतीमुळे माणुसकी जिवंत राहिल्याचे अधोरेखित : जिल्हाधिकारी देसाई

Archana Banage

अजब.. युवतीचा 80 वर्षीय वृद्धाशी विवाह

Patil_p

कर्नाटकात चौथी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

Archana Banage